शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रंगसिद्ध-चिमराया-लक्ष्मी देवीचा पालखी भेट सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 19:05 IST

प्रथम तामदर्डी येथील रंगसिद्ध चिमराया देवाची पालखी मुंडेवाडीच्या शिवारात दाखल झाली

ठळक मुद्देहजारो भाविकांनी खारीक, खोबरे व भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण केली१५ दिवसापूर्वीच ज्वारीची पेरणी झाली होती. ज्वारीचे धाटे तरारून डोलू लागली होती

सोलापूर :-  सूर्य मावळतीकडे झुकलेला... चळळाम, ढोलांचा गजर... खरिक, खोबरे अन् भंडाऱ्याची उधळण... रंगसिद्ध-चिमराया महाराज की जय, लक्ष्मी देवीच चांगभलं... अशा जयघोषात नयनरम्य, भक्तिमय वातावरणात पालखी भेट सोहळा उत्साहात पार पडला.

 ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंडेवाडी (ता. मंगळवेढा) गावच्या शिवारात दिवाळी पाडव्यादिवशी सायंकाळी पालखी भेट सोहळा झाला. 

प्रथम तामदर्डी येथील रंगसिद्ध चिमराया देवाची पालखी मुंडेवाडीच्या शिवारात दाखल झाली. त्यानंतर मुंडेवाडी येथून ढालकाटी आली. त्यापाठोपाठ लक्ष्मी देवीची पालखी मिरवणुकीने लेझीम पथकासह शिवारात आली. गजीढोल व हलगीच्या कडकडाटात दोन्ही पालख्या खेळविण्यात आल्या. त्यानंतर हवेत उंचावून भेटीचा सोहळा झाला. दरम्यान हजारो भाविकांनी खारीक, खोबरे व भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण केली. याप्रसंगी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. 

ज्वारीची धाटे झाली भुईसपाट१५ दिवसापूर्वीच ज्वारीची पेरणी झाली होती. ज्वारीचे धाटे तरारून डोलू लागली होती. मात्र याच ठिकाणी पालखी भेट सोहळा पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी ज्वारीची धाटे तुडवली. त्यामुळे ती भुईसपाट झाली. मात्र दोन दिवसानंतर ती धाटे पुन्हा जोमाने वाढू लागतात, असे येथील भाविकांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर