शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

 गजानन महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात; गण गण गणात बोतेचा जयघोष...

By appasaheb.patil | Updated: June 21, 2023 19:26 IST

यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. 

सोलापूर : पंढरीच्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी श्रीक्षेत्र शेगांव येथून आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळ्याने बुधवारी सायंकाळ साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. 

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठाेंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,  आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, भाजप नेते शहाजी पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, प्रांताधिकारी पडदूने, तहसिलदार राजशेखर लिंबारे, तहसीलदार सैपन नदाफ, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ आदी अधिकारी व मान्यवरांनी पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले.

या पालखीत जवळपास सातशे वारकरी सहभागी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून ही पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर या पालखीचे स्वागत करण्यात आले. सलग दोन वर्ष प्रशासनातील अधिकारी या पालखीचे स्वागत करीत आहेत. आज पालखीचा मुक्काम उळेगावात आहे. येथे रात्री किर्तन, पूजा व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर उद्या गुरूवार २२ जून २०२३ रोजी पहाटे ही पालखी सोलापूर शहरात दाखल होणार आहे.  हा पालखी सोहळा दोन दिवसासाठी सोलापुरात मुक्कामी असणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर