शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात घरावरुन गेलेल्या हायप्रेशर तारांचा शॉक बसून पेंटरचा मृत्यू

By रवींद्र देशमुख | Updated: March 28, 2024 18:43 IST

अजय दुधगे या पेंटरने हुच्चेश्वर नगरातील एका घराला कलर देण्याचे काम घेतले होते.

सोलापूर : घरांवरुन गेलेल्या हायप्रेशन मेन लाईनच्या ताराला स्पर्श झाल्यानं रंगकाम करणाऱ्या पेंटरला हकनाक जीव गमवावा लागला. स्वागत नगरच्या शेजारी असलेल्या हुच्चेश्वर नगरात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अजय जीवन दुधगे (रा. भारत नगर, कुमठा नाका, सोलापूर) असे मृत्यू पावलेल्या पेंटरचे नाव असल्याचे समोर येत आहे.

या घटनेची खबर मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यातील अजय दुधगे या पेंटरने हुच्चेश्वर नगरातील एका घराला कलर देण्याचे काम घेतले होते. गुरुवारी त्याने रंग देण्यास सुरु केली असता दुपारी घरावरुन गेलेल्या हायप्रेशन मेनलाईनला स्पर्श झाल्यानं शॉक बसून अचानक त्याच्या सर्वांगास भाजल्याने शरीर काळे पडले. गच्चीवरील लोखंडी टीप अन्य साहित्य जळाले. भितीलाही तडे गेल्याचे सांगण्यात आले.पोलिसांनी तातडीने भाजलेल्या अवस्थेतील पेंटरला शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले.

मेन लाईन हटवण्याची अनक दिवसांपासूनची मागणीशहरातील कुमठा नाका, स्वागत नगर, नागेंद्र नगर या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरावरुन महावितरणच्या उच्चदाब विद्युत तारा गेल्या आहेत. त्या हटवल्या जाव्यात यासाठी गेली अनेक दिवसांपासून येथील नागिरकांनी महावितरणकडे मागणी केली असल्याचे सांगण्यात आले.

जबाबदार कोण?गेली अनेक दिवसांपासून धोकादायक मेन लाईन घरावरुन हटवावी अशी मागणी होत असताना याची दखल घेतली गेली नाही. आता मृत्यू पावलेल्या अजय दुधगे यांच्या मरणाला जबाबदार कोण असा सवाल हुच्चेशवर नगरातील रहिवाशांनी केला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर