शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

लोकसहभागातून कुर्डू, लऊळ, रोपळेकरांनी सुरू केले ऑक्सिजन बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:36 IST

कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील अनेक गावांतून कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने त्यांना आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील सरकारी व खाजगी ...

कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील अनेक गावांतून कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने त्यांना आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील सरकारी व खाजगी आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तपासणी मोहिमेत बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. आता बाधितांचा आकडा कमी होऊ लागला आहे. दरम्यान, रोपळे, लऊळ व कुर्डू या मोठ्या तीन गावांतील गावकऱ्यांनी एकत्र येत लोकसहभागातूनच ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारले.

रोपळे येथे ग्रामपंचायतच्या वतीने स्व. पांडुरंग माधवराव दळवे यांच्या स्मरणार्थ कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांच्या हस्ते झाले. लक्ष्मणराव पवार विद्यालय रोपळे यांच्या वतीने मागासवर्गीय पांडुरंग रुक्मिणी सभागृह येथे सुरू केलेल्या सेंटरमध्ये एकूण ५० बेड व २ ऑक्सिजन बेड दिले आहेत. सरपंच तात्यासाहेब गोडगे, उपसरपंच तानाजी दास, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शरद पाटील, प्राचार्य योगेश दळवे, श्रीपाद दळवे, डॉ. महेश चव्हाण, डॉ. संजय माळी, अतुल दास, रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उबाळे, ढेरे या परिचारिका नवनाथ गवळी, जगदीश निंबाळकर, अतुल गोडगे, बालाजी गोडगे, कृष्णा दास, अप्पा बनकर यांनी परिश्रम घेतले.

लऊळ येथील लोकसहभागातून सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी झेडपी सदस्य भारत शिंदे, माजी उपसभापती प्रतापराव नलवडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड, डॉ. रोहित बोबडे, डॉ. लकी दोशी, डॉ. ज्ञानेश्वर लंगोटे, डॉ. प्रवीण चोपडे, डॉ. मकरध्वज क्षीरसागर, डॉ. सावरे, सरपंच पूजा बोडके, उपसरपंच संजय लोकरे, ओबीसी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण घुगे, बापू लोकरे, कल्याण गाडेकर, आरोग्यसेवक राऊत उपस्थित होते.

---

लऊळमध्ये साडेतीन लाख जमा

लऊळ येथील नागरिकांनी रोख स्वरूपात ३ लाख ४० हजार रुपये जमा केले, तसेच १४ बेड, १० टूल, ७ खुर्ची, मग ५, बकेट ५, मास्क ५००, मग, फॅन ११, ऑक्सिजन मशीन, सॅनिटायझर २५ लिटर, थर्मामीटर, ऑक्सिमीटर व प्रथमोपचार गोळ्या या वस्तू डॉ. चोपडे यांच्याकडून देण्यात आल्या. रवींद्र मांजरे यांच्याकडून ऑक्सिजन रिफिलिंग, तर चहा, नाश्ता व जेवणाची जबाबदारी राजू कोळी व श्रीरंग भोंग यांनी स्वीकारली. गावातील खाजगी डॉक्टर तपासणी करताहेत.

---

आंतरभारतीत ५ ऑक्सिजन सेंटर

कुर्डू येथे लोकसहभागातून सुरू केलेल्या आंतरभारती शाळेतील कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच अर्चना जगताप, उपसरपंच अण्णासाहेब ढाणे, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार माढेकर उपस्थित होते. गावातील नागरिकांनी २६ बेड, कॉट, गादी, उशी, १० फॅन, ५ ऑक्सिजन सिलिंडर, १० डस्टबीन आदी साहित्य उपलब्ध करून दिले, तर ग्रामपंचायतही त्या सेंटरला दिवा बत्ती, पिण्याचे पाणी, आंघोळीचे पाणी, साफसफाई करीत आहे. येथील आशा वर्कर व गावातील खाजगी डॉक्टर विशाल अनंतकवळस व सूरज माकुडे परिश्रम घेत आहेत.

....

फोटो :

लऊळ येथे लोकसहभागातील कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन करताना झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, माजी उपसभापती प्रतापराव नलवडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, सरपंच पूजा बोडके, उपसरपंच संजय लोकरे.