शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : शेतकरीविरोधी कायदे आणून केंद्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात दिल्लीत हजारो शेतकरी आंदोलन करताहेत. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील पूनम गेटवर रात्रभर जागरण केले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी रात्रभर जागरण केले.
गुरुवारी रात्री थंडी होती. या थंडीतच आंदोलन सुरू राहिले. थंडीत कुडकुडत स्वाभिमानीचे कार्यकर्ते सरकारविरोधात हल्लाबोल केला. शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलन सुरू राहील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल तसेच युवा आघाडीचे अध्यक्ष विजय रणदिवे यांनी ‘लोकमत’ला दिली.
यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील, तानाजी बागल, श्रीमंत केदार, अजित बोरकर, रवींद्र गोडगे, सत्यवान गायकवाड, अमरसिंह माने, कमलाकर माने, दिनेश गाडेकर, इक्बाल मुजावर, सदाशिव वाघमोडे, दिनेश शिंदे, विजय साठे, सुदर्शन शेळके, अमर इंगळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.