शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे आलमट्टी धरण ओव्हरफलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 19:00 IST

आलमट्टी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सप्ताहापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच बंगलोर वेधशाळेने पुढील दोन दिवसात पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने ओव्हरफ्लो झालेल्या आलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे मंगळवारी दुपारी अर्धा फूट वर उचलून कृष्णा नदीत ९०१२५ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

ठळक मुद्दे धरण पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला२९० मेगावॅट विजेचे उत्पादन सुरू पावसाचा जोर वाढल्याने कृष्णेची पाणी पातळी खालावली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर/विजयपूर दि १७ : आलमट्टी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सप्ताहापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच बंगलोर वेधशाळेने पुढील दोन दिवसात पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने ओव्हरफ्लो झालेल्या आलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे मंगळवारी दुपारी अर्धा फूट वर उचलून कृष्णा नदीत ९०१२५ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.आलमट्टी धरण पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाचा जोर चार-पाच दिवसांपासून आहे. आलमट्टी धरणात सध्या १२३.०८१ टीएमसी पाणीसाठा आहे.  पुढील दोन दिवस पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज  बंगलोर वेधशाळेने वर्तविल्याने वाढत जाणारी जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे अर्धा फूट उचलण्यात आले आहे. त्यातून नदीपात्रात ९०१२५ क्युसेक्स तसेच जलविद्युत पेंद्रासाठी ४५ हजार क्यूसेक पाणी अतिरिक्त सोडण्यात येत आहे. त्यामुळे २९० मेगावॅट विजेचे उत्पादन सुरू झाले आहे. सध्या आलमट्टी धरणात जेवढे पाणी येत आहे. त्याच प्रमाणात धरणातून पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने कृष्णेची पाणी पातळी थोडी खालावली आहे. त्यामुळे धरणात येणारे पाण्याची आवक येथून पुढे कमी होणार आहे. पायथा वीजगृहातून ४५००० क्युसेक्स सोडण्यात येत आहे. धरणाचे दरवाजे उघडून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्याची ही या महिन्यातील दुसरी वेळ आहे.