शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

द्वेषापोटी काही संघटनांनी केली विठ्ठल मंदिरातील प्रक्षाळपुजेची उलट-सुलट चर्चा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 18:10 IST

पंढरपूर: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन 

पंढरपूर : श्री विठ्ठल प्रक्षाळपूजेबाबतीत काही संघटनांनी श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या द्वेषापोटी उलट सुलट चर्चा सुरू केली. त्यामुळे मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विठ्ठलाच्या गाभार्‍यात प्रवेश नाकारला आहे. यामुळे या निर्णयाच्या विरोधात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी संघाने एक ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.

आषाढी यात्रा २०२० मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा ०९ जुलै २०२० रोजी रूढी व परंपरेनुसार संपन्न झाली. या पूजेच्या बाबतीत काही संघटनांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या द्वेषापोटी उलट सुलट चर्चा सुरू केली.  त्याबाबतच्या तक्रारी दिल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने सभा घेवून मंदिरातील अधिकारी व कर्मचारी यांना कोणत्याही स्वरूपाची खातरजमा व वस्तुस्थितीची शाहनिशा न करता श्री विठ्ठल व रूक्मिणी गाभारा येथे प्रवेश बंदी केली आहे. तथापि मंदिर समितीने केलेली कारवाई नैसर्गीक न्याय तत्वाला अनुसरून नाही.

 तसेच सदरची प्रक्षाळपुजा अनेक वर्षापासून सुरू असलेल्या रूढी व परंपरेनुसार झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर गाभारा बंदीचा घेतलेला निर्णय मंदिर समितीने तात्काळ मागे व्यावा. असे प्रसिद्धीपत्रक श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या ईमेल आयडी वरून देण्यात आले आहे.---------------------------अन्यथा १ ऑगष्ट २०२० पासून मंदिर समितीकडील सर्व कर्मचारी सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन करतील. असा निर्णय श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचारी संघाने घेतला आहे. - राजाभाऊ राऊत,अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचारी संघ, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर