शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा १८० कोटींची ड्रेनेज योजना रद्द करू, नगरविकास खात्याचे सोलापूर महापालिकेला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 11:27 IST

अमृत अभियानातून सोलापूरच्या उर्वरित हद्दवाढ भागासाठी १८० कोटी भुयारी गटार योजना शासनाने मंजूर केली आहे

ठळक मुद्दे हद्दवाढ भागासाठी १८० कोटी भुयारी गटार योजना शासनाने मंजूर केली ड्रेनेज योजनेची सोलापूरला गरज शासनाचे पत्र महापालिकेला आल्याची माहिती सायंकाळी मिळाली

सोलापूर : केंद्र शासनाने अमृत योजनेतून हद्दवाढ भागासाठी मंजूर केलेल्या १८० कोटींच्या भुयारी गटार योजनेबाबत ७ एप्रिलपर्यंत निर्णय घ्या; अन्यथा या योजनेची सोलापूरला गरज नाही, असे गृहीत धरून हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल, असे पत्र नगर विकास विभागाचे सहसचिव पां. जो. जाधव यांनी मंगळवारी महापालिकेस पाठविले आहे. अमृत अभियानातून सोलापूरच्या उर्वरित हद्दवाढ भागासाठी १८० कोटी भुयारी गटार योजना शासनाने मंजूर केली आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात पूर्ण केली आहे. त्यानंतर या निविदेस मान्यता देण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करणे आवश्यक होते. पण वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेने हा प्रस्ताव ३ एप्रिलपर्यंत शासनाकडे सादर केलेला नाही. ३१ मार्चच्या सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेता ही सभा पुढे ढकलण्यात आली. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अमृत योजनेतील मलनिस्सारण प्रकल्पाच्या निविदेबाबत महापालिकेने ७ एप्रिलपूर्वी निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यानुसार मनपा सभेने याबाबत ठराव संमत करून त्याबाबतचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीसमोर ठेवण्यासाठी विशेष दूतामार्फत तातडीने नगर विकास विभागाकडे हा प्रस्ताव पाठवावा. ही वस्तुस्थिती महापौर, नगरसेवकांनी लक्षात घ्यावी; अन्यथा अमृत योजनेतील प्रकल्पास विलंब झाल्यास सोलापूर महापालिकेला या प्रकल्पाची गरज नाही, असे समजून प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल, असा इशारा सहसचिव जाधव यांनी मनपा आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे. 

शासनाचे पत्र महापालिकेला आल्याची माहिती सायंकाळी मिळाली आहे. पण मी सोलापुरात नसल्याने पत्र पाहिलेले नाही. ड्रेनेज योजनेची सोलापूरला गरज आहे. शासनाचे आदेश असतील त्याप्रमाणे लवकर तहकूब सभा घेऊन हा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवून देऊ.- शोभा बनशेट्टी, महापौर

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका