शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
4
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
5
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
6
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
7
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
8
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
9
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
10
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
11
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
12
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
13
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
14
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
15
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
16
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
17
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
18
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
19
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
20
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 

अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन

By admin | Updated: June 16, 2014 01:17 IST

मुंडेसाहेब अमर रहे : असंख्य कार्यकर्त्यांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन

सोलापूर : ‘अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे’ अशा घोषणा देत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिकलशाचे रविवारी सोलापुरातील असंख्य चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले़ सोलापुरातून दुपारी हा अस्थिकलश मोहोळमार्गे पंढरपुरात नेण्यात आला आणि सायंकाळी साडेपाच वाजता चंद्रभागा नदीत या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले़ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा अस्थिकलश रविवारी सकाळी सिध्देश्वर एक्स्प्रेसने आ़ विजयकुमार देशमुख, अशोक निंबर्गी, अशोक कटके, संजय कोळी, राजू पाटील यांनी आणला़ त्यानंतर हा अस्थिकलश नवीपेठेतील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर दर्शनासाठी दुपारी अडीचपर्यंत ठेवण्यात आला होता़ महापौर अलका राठोड, आ़ दिलीप माने, आ़ सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार भाई एस़एम़ पाटील, माजी आमदार नरसिंग मेंगजी, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, विष्णू कारमपुरी आदींनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले़अस्थिकलशाच्या दर्शनासाठी पिंटू महाले, चन्नवीर चिट्टे, विक्रम देशमुख, प्रशांत फत्तेपूरकर, अमर पुदाले, संजय वाघमारे, संजय क्षीरसागर, बाबूराव घुगे, काशिनाथ थिटे, बाबा बडवे आदी उपस्थित होते़ दुपारी अडीच वाजता हा अस्थिकलश मोहोळला नेण्यात आला़ तेथे अर्धा तास दर्शनासाठी ठेवण्यात आला होता़ त्यानंतर पंढरपुरात नेऊन सायंकाळी साडेपाच वाजता अस्थिकलशाचे आ़ विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक चाहत्यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले़ धर्मपुरीत दुसरा अस्थिकलशभाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा दुसरा अस्थिकलश मुंबईहून माजी खासदार सुभाष देशमुख यांनी धर्मपुरी येथे रविवारी सकाळी आणला होता़ त्यावेळी त्यांच्या समवेत राजकुमार पाटील, शहाजी पवार , सचिन कल्याणशेट्टी, संजय कोकाटे आदी उपस्थित होते़ धर्मपुरी, नातेपुते, सदाशिवनगर, माळशिरस, वेळापूर आदी ठिकाणी हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवला़ दुपारी अडीच वाजता तो पंढरपुरात आणला़ चौपाडमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आला़ यावेळी प्रशांत परिचारक यांच्यासह महायुती व विविध पक्षांच्या नेत्यांनी दर्शन घेऊन मुंडे यांना श्रध्दांजली वाहिली़ शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली़ तेथून रथामध्ये अस्थिकलशाची मिरवणूक काढून चंद्रभागेत अस्थींचे विसर्जन केले़ यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मुंडे साहेब अमर रहेच्या घोषणा दिल्या़ ---------------------------------------------------भाजपामध्ये अशीही दुफळी....मुंडे हयात असल्यापासून ते त्यांचे निधन झाल्यापर्यंत आणि त्यांना श्रध्दांजली वाहण्यापासून ते अस्थींचे विसर्जन करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी भाजपमधील गटबाजी दिसून आली़ श्रध्दांजलीच्या कार्यक्रमात गटतटाने कार्यक्रम राबवून सर्वपक्षीय श्रध्दांजलीस स्वरुप दिले़ प्रत्यक्षात चित्र वेगळे होते़ मुंडेंच्या अस्थींचे विसर्जन शहर भाजप कार्यकर्त्यांनी शहराच्या जवळपास म्हणजेच दक्षिण सोलापुरातील नदीकाठी करावे असे ठरले होते तर ग्रामीण भाजपाने पंढरीत अस्थी विसर्जन करण्याचे ठरले होते मात्र दोघांनीही पंढरीत अस्थी विसर्जन केले़ मुंडेंना श्रध्दांजली वाहणे असो की त्यांच्या अस्थींचे विसर्जन असो प्रत्येक ठिकाणी शिस्तबध्द समजल्या जाणाऱ्या भाजपमध्ये दुफळी दिसली़