शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील कारी गावचा उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 19:56 IST

ग्रामस्थांच्या प्रलंबित मागणीला मिळाले यश; फटाके वाजवून केला आनंद व्यक्त

ठळक मुद्देकारी (ता. बार्शी) हे गाव सोलापूर जिल्ह्यात होते. भौगोलिकदृष्ट्या ते सोलापूरपासून खूप दूर होते गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या मागणीला यश आले

कारी : कारी (ता. बार्शी) हे गाव सोलापूर जिल्ह्यातून उस्मानाबाद  जिल्ह्यात समाविष्ट झाल्याचे राजपत्रित अध्यादेश जाहीर झाले. यामुळे नागरिकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

कारी (ता. बार्शी) हे गाव सोलापूर जिल्ह्यात होते. भौगोलिकदृष्ट्या ते सोलापूरपासून खूप दूर होते. अनेक शासकीय कामासाठी नागरिकांची होणारी ससेहोलपट होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून गावचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात होण्यासाठी नागरिकांची व ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह विधाते यांची मागणी होती, परंतु शासकीयस्तरावरून कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नव्हती, असे नागरिकांना वाटत होते.

गतवर्षी जून २0१८ मध्ये राज्यपाल राजपत्रित अधिसूचना गावाचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात होण्याबद्दल हरकत मागवली होती. हरकती कालावधीत गावाचे स्वागत करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक पक्ष व नेत्यांची मांदियाळी झाली होती, परंतु गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या मागणीला यश आले आहे. २७ मे २0१९ रोजी राज्यपाल राजपत्रित अधिसूचना जाहीर झाली असून, १ आॅगस्ट २0१९ पासून कारी (ता. बार्शी) गावाचा समावेश कारी (ता. व जि. उस्मानाबाद) असा होणारा अध्यादेश प्राप्त झाला आहे. 

अध्यादेश प्राप्तमहाराष्ट्र शासन राजपत्र महसूल व वनविभागाच्या २७ मे २0१९ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल सहित १९६६ क्रमांक प्राफेब २0१८ प्र. क्र. /३४ /म १0 पोट कलम (१)चे खंड चार व सहा महाराष्ट्र शासन उक्त कलम ४ नुसार केलेल्या पूर्व प्रसिद्धीनंतर कारी गावाचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्यासह सचिव रवीराज फले यांच्याकडून प्राप्त झाला आहे. गावात आदेश सोशल मीडियावर प्राप्त झाल्यामुळे अनेकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयOsmanabadउस्मानाबादgovernment schemeसरकारी योजना