शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात २ फेबु्रवारीपासून राज्यस्तरीय सुशील करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 16:18 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेतर्फे २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. हुतात्मा स्मृती मंदिरच्या मंचावर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील आठही नाट्य परिषद शाखेच्या ...

ठळक मुद्दे जिल्ह्यातील आठही नाट्य परिषद शाखेच्या अध्यक्षांची उपस्थिती असणारस्पर्धेचे यंदाचे १० वे वर्ष असून गेल्या नऊ वर्षात महाराष्टÑातील अनेक उदयोन्मुख कलावंतांनी या स्पर्धेत सहभाग या स्पर्धांमुळे राज्यभरातील विविध सांस्कृतिक व नाट्यकलावंतांना सहभागी होता येणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेतर्फे २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. हुतात्मा स्मृती मंदिरच्या मंचावर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील आठही नाट्य परिषद शाखेच्या अध्यक्षांची उपस्थिती असणार आहे तर पारितोषिक वितरण समारंभ ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सिनेकलावंत महेश कोठारे व आदिनाथ कोठारे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.स्पर्धेचे यंदाचे १० वे वर्ष असून गेल्या नऊ वर्षात महाराष्टÑातील अनेक उदयोन्मुख कलावंतांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धांमुळे राज्यभरातील विविध सांस्कृतिक व नाट्यकलावंतांना सहभागी होता येणार आहे. उद्घाटन समारंभास अकलूज नाट्य परिषदेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, उपनगरीय शाखा सोलापूरचे अध्यक्ष विजय साळुंके, महानगर सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. अजय दासरी, पंढरपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मंदार सोनवणे, मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष डॉ. सुभाष कदम, सांगोला शाखेचे अध्यक्ष चेतनसिंह केदार, बार्शी शाखेचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेकर यांची उपस्थिती असणार आहे. या स्पर्धा तिन्ही दिवस सकाळी ८ वाजता सुरू होतील. या स्पर्धेमधील प्रथम क्रमांक विजेत्यास सुशील करंडक व २५ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास स्मृतिचिन्ह व १५ हजार रुपये, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय स्त्री व पुरुष, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाशयोजना, उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय खास स्पर्धेसाठी लिहिलेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट एकांकिकेसाठी रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेस विद्या काळे, अशोक शेट्टी, विठ्ठल बडगंची शांता येळंबकर, आनंद खरबस आदी पदाधिकारी उपस्थित होते.------------------------या एकांकिकांचे सादरीकरण- या स्पर्धेत शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी बॅक कौन मारा?, तिनं असं का केलं ?, कँटीन, कम्पेअर, लाल काळोख, चंद्रपूरच्या जंगलात, यज्ञाहुती, माझं नाव अविनाश आचार्य, मित्तर, खटारा, शोध, बिटवीन द लाईफ या एकांकिका सादर होतील.-  शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी अ‍ॅनिमल प्लॅनेट, भर चौकात गांधी पुतळ्यासमोर, अर्धवट गोष्ट, सूरज के बुलंद हौसले, ट्रॅफिक, तस्करी, दिमडी, लूजर्स, सेकंड चान्स, धसकट, बीर्इंग अ‍ॅन्ड नथिंग, वॉर आॅफ डीजे, टरफल व चंडप्रचंड- रविवारी ४ फेब्रुवारी रोजी अफू, बयाबा, लागण, अरफान्स, कपान, मिसिंग, जर्नी, छुटा छेडा, अभंग, बीपी, तेरे मेरे सपने या एकांकिका सादर होणार आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर