शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान श्रेष्ठदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 14:24 IST

भारतामध्ये डॉ. वेणुगोपाल यांनी पहिले हृदय प्रत्यारोपण दिल्ली येथे एम्स हॉस्पिटलमध्ये १९९४ साली केले. 

ठळक मुद्देसबंध भारतात १३ आॅगस्ट अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातोकिडनी, डोळे या अवयवदानाबरोबरच आजकाल हृदय अवयवदानाची चळवळ वेग घेत आहे१९६७ साली साऊथ आफ्रिकेमध्ये ख्रिश्चन बर्नाड यांनी पहिले यशस्वी एका मनुष्यामधील हृदय दुसºया मनुष्यामध्ये प्रत्यारोपित केले

सबंध भारतात १३ आॅगस्ट अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. अवयवदान ही एक काळाची गरज आहे. किडनी, डोळे या अवयवदानाबरोबरच आजकाल हृदय अवयवदानाची चळवळ वेग घेत आहे. १९६७ साली साऊथ आफ्रिकेमध्ये ख्रिश्चन बर्नाड यांनी पहिले यशस्वी एका मनुष्यामधील हृदय दुसºया मनुष्यामध्ये प्रत्यारोपित केले. परंतु या प्रक्रियेमध्ये होणाºया मृत्यूमुळे ही चळवळ नंतर संथ झाली. १९८० साली हृदय प्रत्यारोपण झाल्यानंतर शरीर त्याला नाकारू नये म्हणून औषधांचे शोध लागले आणि त्यानंतर या चळवळीने वेग पकडला. भारतामध्ये डॉ. वेणुगोपाल यांनी पहिले हृदय प्रत्यारोपण दिल्ली येथे एम्स हॉस्पिटलमध्ये १९९४ साली केले. जगामध्ये वर्षाला जवळपास तीन हजार लोकांना हृदय प्रत्यारोपण सध्या केले जाते. हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमध्ये साधारण आॅपरेशन झाल्यानंतर एक वर्ष जगण्याची मर्यादा ८० टक्के लोकांमध्ये असते. हृदय प्रत्यारोपण झालेले ५० टक्के रुग्ण १० वर्षे व्यवस्थित जगू शकतात. 

काही रुग्णांमध्ये जन्मजात हृदयरोग असतात. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असल्यामुळे हृदय निकामी झाले असेल तर हृदय प्रत्यारोपणाचा विचार केला जातो. या ठिकाणी विशेष गोष्ट जी सर्वांनी लक्षात ठेवायची आहे की सर्वांनाच हृदय प्रत्यारोपण करता येत नाही. ज्या रुग्णांचे हृदय कमजोर झाले आहे आणि त्यांना औषधांचा त्याचबरोबर आॅपरेशनचा त्यांच्या हृदयात दुरुस्ती करण्याचा दुसरा काहीही पर्याय उपलब्ध नसेल आणि रुग्णाचे आयुष्य एक वर्षापेक्षा कमी राहिले असेल तरच हृदय प्रत्यारोपणाचा विचार केला जाऊ शकतो. कारण ही प्रक्रिया खूप खर्चिक आहे आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा मृत्यू होण्याचा दर खूप जास्त असतो. 

हृदयदान करायचे असते त्यांच्या नातेवाईकांनी पेशंटचा ब्रेन डेथ झाला असेल, मेंदू पूर्णपणे निष्क्रिय झाला असेल आणि त्यांनी संमती दिली तरच हृदयदान करता येते. पेशंटचे हृदय पहिल्यांदा तपासले जाते. वय ५५ वर्षांपेक्षा कमी हृदयाचे काम ४५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल रक्तदाब व्यवस्थित असेल आणि हृदयदात्याला कुठल्याही प्रकारचे जंतुसंसर्ग कॅन्सर किंवा हृदयाचा काही दुसरा आजार नसेल तर असे हृदय हृदयदान म्हणून घेता येते. ज्या रुग्णाला हृदय द्यायचं आहे आणि ज्याचे हृदय घ्यायचे आहे अशा दोन्ही लोकांचा रक्तगट आणि शरीराचे आकारमान मिळते-जुळते असणे गरजेचे आहे. जर रक्तगट आणि शरीर आकारमान जुळत नसेल तर अशी प्रक्रिया करता येत नाही. हृदय दान झाल्यानंतर एका विशिष्ट थंड बॉक्समध्ये आणि एका विशेष द्रव्यामध्ये हृदय ठेवून पाठवले जाते.

आजकाल हृदय काढल्यानंतर ते एका मशीनला जोडून लगेचच हृदय शरीराच्या बाहेरही पंपिंग करत दुसºया ठिकाणी पाठवता येते. त्यामुळे हा मधला जाणारा वेळ बारा तासांपर्यंत वाढवता येतो. मिळालेले हृदय चांगले असेल तर ज्या रुग्णाच्या शरीरामध्ये ते लावायचे आहे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली जाते. छाती खोलून त्या रुग्णाचे हृदय पहिल्यांदा बाहेर काढले जाते आणि या वेळांमध्ये रक्ताभिसरण मशीनद्वारे चालू ठेवले जाते. हृदयाचे कप्पे हृदयाच्या नसा जोडल्या जातात आणि त्यानंतर हृदय चालू होण्याची वाट पाहिली जाते. अशाप्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये साधारणत: ८० ते ९० टक्के यशाचे प्रमाण आहे. 

आॅपरेशन यशस्वी झाल्यानंतर साधारणत: तीन आठवड्यांपर्यंत हॉस्पिटलमध्ये ठेवले जाते. या काळामध्ये नवीन बसवलेले हृदय रुग्णाचे शरीर नाकारू नये म्हणून प्रतिकारशक्ती कमी करण्याचे औषध दिले जातात. या काळामध्ये पेशंटला जंतुसंसर्ग होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे रुग्णाला लोकांपासून वेगळे सुरक्षित ठेवले जाते. ज्यांना आयुष्यामध्ये काहीही आशा राहिलेली नाही, हृदय कमजोर झाले आहे, अशा रुग्णांसाठी हृदयदान किंवा प्रत्यारोपण हे वरदान ठरले आहे. या आॅपरेशनसाठी लागणारी रक्कम वीस ते पस्तीस लाखांपर्यंत आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेनंतर आजपर्यंत सर्वात जास्त जगलेल्या इंग्लंडमधील एका व्यक्तीचे आयुष्य बत्तीस वर्षांनी वाढले. मृत्यू समोर दिसत असताना मृत्यूच्या जबड्यातून परत येऊन नवीन हृदयाने तेवढे मोठे आयुष्य हे खरोखर निसर्गाचा चमत्कार आहे - डॉ. विजय अंधारे   (लेखक हृदय शल्यविशारद आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यOrgan donationअवयव दानMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर