शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध मातेला पोटगी देण्याचा मुलास आदेश, जिल्हा न्यायालयाचा आदेश, निवासासाठी दोन खोल्या देण्याचाही बजावला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 14:23 IST

वडिलांच्या निधनानंतर मातेस न सांभाळणाºया पूर्व भागातील महेश सत्यमूर्ती येमूल (वय ४०, रा. १९४, अशोक चौक, सोलापूर) यास वृद्ध आई सिद्धम्मा सत्यमूर्ती येमूल (वय ६८)हिस उपजीविकेसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगीपोटी रक्कम देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सारिका जाधव यांनी बजावला.

ठळक मुद्दे या आदेशाची अंमलबजावणी संरक्षण अधिकारी पोलीस ठाण्यामार्फत करण्याचा आदेश पारित केला न्यायालयाच्या या आदेशामुळे दाव्यातील मुलगा आणि सुनेला चपराकसंभाव्य घटनांना यानिमित्ताने आळा बसावा, अशी अपेक्षा तक्रारदार मातेचे वकील अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर यांनी व्यक्त केली.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : वडिलांच्या निधनानंतर मातेस न सांभाळणाºया पूर्व भागातील महेश सत्यमूर्ती येमूल (वय ४०, रा. १९४, अशोक चौक, सोलापूर) यास वृद्ध आई सिद्धम्मा सत्यमूर्ती येमूल (वय ६८)हिस उपजीविकेसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगीपोटी रक्कम देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सारिका जाधव यांनी बजावला. याशिवाय मुलगा राहत असलेल्या घरजागेतील दोन खोल्याही निवासासाठी देण्याचे आदेश केले आहेत.या दाव्याची पार्श्वभूमी अशी की, यातील वृद्ध माता सिद्धम्मा यांचे पती सत्यमूर्ती येमूल यांचे २६ जानेवारी २०१० रोजी निधन झाल्यानंतर मुलगा महेश व सून कल्पना हे सिद्धम्माला राहत असलेल्या ठिकाणी त्रास देत असत. मारहाणीबरोबर दिवसातून एकवेळ उपाशी ठेवले जात असे. मुलगा आईशी अपमानास्पद बोलून तिचा मानिसक छळ करत असे. राहत्या घरातूनही तिला हाकलून दिले. तिला उपजीविकेसाठी लागणारी कोणतीच सोय करण्यात आली नाही. या प्रकाराने असहाय्य झालेल्या सिद्धम्माने अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर व किरण कटकूर यांच्यामार्फत महिलांचा संरक्षण कायदा व कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ कलम १२ अन्वये मुलगा व सून यांनी वृद्व मातेस कौटुंबिक हिंसाचार केल्याबद्दल कारवाई करावी व त्यांच्याकडून पोटगी मिळावी म्हणून सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सारिका जाधव यांच्याकडे फौजदारी दावा दाखल केला.न्यायालयाने वृद्ध मातेचा जबाब घेतला. त्यांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात मुलगा महेश हा एकुलता एक असून, टेक्स्टाईल कारखानदार आहे. त्याला दरमहा ६५ हजार उत्पन्न आहे. त्याची मातेला जास्तीत जास्त पोटगी देण्याची ऐपत आहे. त्याने आईला मिळकत हडप करण्याच्या हेतूने घरातून हाकलून दिले, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेऊन मुलगा महेश व सून कल्पना यांनी मातेविरुद्ध कोणत्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक छळ करू नये, आईस दरमहा १० हजार रुपये अर्ज दाखल केलेल्या ५ मे २०१६ पासून निरंतर पोटगी देण्याचा आदेश दिला. तसेच मुलगा राहत असलेल्या घर नं. १९४, अशोक चौक, सोलापूर या मिळकतीमध्ये सर्व सोयीनियुक्त दोन खोल्या राहण्यासाठी देण्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी संरक्षण अधिकारी पोलीस ठाण्यामार्फत करण्याचा आदेश पारित केला आहे. या कामी अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर व किरण कटकूर यांनी काम पाहिले.----------------मुलगा-सुनेला चपराक...- समाजात अशा प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडतात. न्यायालयापुढे ज्या माता पुढाकार घेऊन धाव घेतात तेव्हाच अशा बाबी निदर्शनाला येतात. न्यायालयाच्या या आदेशामुळे दाव्यातील मुलगा आणि सुनेला चपराक बसली असून, संभाव्य घटनांना यानिमित्ताने आळा बसावा, अशी अपेक्षा तक्रारदार मातेचे वकील अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Solapurसोलापूर