शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

सहकारमंत्र्यांच्या सोलापूरातील दौºयात शेतकºयांचा विजेसाठी आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 11:20 IST

सोलापूर : भाजपच्या ‘बुथ चलो अभियान’साठी मतदारांच्या भेटीला आलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना विजेच्या कृत्रिम टंचाईला तोंड देणाºया शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे बुधवारी तातडीची बैठक घेऊन विजेचा प्रश्न सोडवा, असे फर्मान सहकारमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना सोडले. येत्या ६ एप्रिल रोजी मुंबईत बीकेसी मैदानावर भाजपाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे ...

ठळक मुद्दे येत्या ६ एप्रिल रोजी मुंबईत बीकेसी मैदानावर भाजपाचा महामेळावा १० गावांना भेटी देऊन सहकारमंत्र्यांनी मतदारांशीही संवाद साधला

सोलापूर : भाजपच्या ‘बुथ चलो अभियान’साठी मतदारांच्या भेटीला आलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना विजेच्या कृत्रिम टंचाईला तोंड देणाºया शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे बुधवारी तातडीची बैठक घेऊन विजेचा प्रश्न सोडवा, असे फर्मान सहकारमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना सोडले.

 येत्या ६ एप्रिल रोजी मुंबईत बीकेसी मैदानावर भाजपाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या लोकाभिमुख योजना, विकासकामांची माहिती देण्यासाठी ‘बुथ चलो अभियान’चे आयोजन करण्यात आले आहे. थेट बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी हा संपर्क दौरा आहे. आज एका दिवसात तब्बल १० गावांना भेटी देऊन सहकारमंत्र्यांनी मतदारांशीही संवाद साधला. उत्तर सोलापूर तालुक्यातून सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान सहकारमंत्र्यांचा ताफा कंदलगावात दाखल झाला. ग्रामस्थांनी कॅनॉलचे पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली. तेथूनच मंत्र्यांनी जलसंपदा अधिकाºयांशी संपर्क साधून उजनीचे पाणी तातडीने सोडण्याचे आदेश सोडले. दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान कॅनॉलला पाणी सोडण्यात आले. मंत्र्यांचा दौरा भीमा नदीकाठच्या ‘त्या’ चार गावात येताच शेतकºयांचा आक्रोश सुरू झाला. लवंगी, कारकल, औज (म), कुरघोट या चार गावात सध्या अवघा दोन तास वीजपुरवठा केला जातो.  हा वीजपुरवठा चार तास करण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी मंत्र्यांसमोर संतप्त भावना मांडल्या. तीच स्थिती चिंचपूरमध्ये काही प्रमाणात दिसून आली.  या दौºयात प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या सेक्रेटरी स्वाती जाधव, प्रदेश सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य सहकारी बँकेचे संचालक अविनाश महागावकर, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, पं. स. सदस्य एम. डी. कमळे, शशिकांत दुपारगुडे, जि. प. सदस्य प्रभावती पाटील, प्रशांत कडते, भीमाशंकर नरसगोंडे, गुरण्णा तेली, मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, महिला तालुकाध्यक्ष सुशीला ख्यमगोंडे, डॉ. चनगोंडा हविनाळे आदी सहभागी झाले होते.जिल्हा प्रशासनाची आज बैठक- भीमा नदीकाठच्या शेतकºयांच्या वीजपुरवठ्यासाठी संतप्त भावना जाणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला. उद्या बुधवारी चार तास वीजपुरवठा करण्याच्या मागणीवर चर्चा करून तातडीने निर्णय घेण्यासाठी जलसंपदा, महावितरण, सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक घेण्याचे आदेश दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSubhash Deshmukhसुभाष देशमुखmahavitaranमहावितरण