सोलापूर दि २९ : सोलापूर शहरातील पासपोर्ट कार्यालयाचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही़ के़ सिंह यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे उदघाटन करण्यात आले़ यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा़ शरद बनसोडे, विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ प्रणिती शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, सोलापूर पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख अतुल गोतसुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते़ व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे बोलताना परराष्ट्रमंत्री म्हणाले की, आज सोलापूरात सुरू होणारा हा ८ वा पासपोर्ट केंद्र आहे़ ही सेवा सुरू करण्यासाठी खूप उशिर लागला़ भारतीय सेवा पासपोर्ट कार्यालय सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत आहे़ पोस्ट कार्यालयातही पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येत आहे़ कोणत्याही नागरिकास ५० किलोमीटरच्या आत पासपोर्ट मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे़ सोलापूरच्या पासपोर्ट कार्यालयामुळे सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागांना याचा लाभ मिळेल असेही ते म्हणाले़ यावेळी सोलापूर शहर परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते़
सोलापूरात पासपोर्ट कार्यालयाचे थाटात उदघाटन
By appasaheb.dilip.patil | Updated: August 7, 2017 18:30 IST