शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पीडित महिलांसाठी सोलापुरात वन स्टॉप सेंटर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 11:45 IST

पीडित महिलांना वैद्यकीय, पोलीस आणि कायदेविषयक मदत करण्यासाठी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत मिळणारे वन स्टॉप सेंटर सोलापूर येथे उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनिराधार महिलांना आधार देणारे शेल्टर होम करमाळा येथेवर्किंग वुमेन होस्टेल कोठे सुरु करायचे या संदर्भातील निर्णय अद्याप नाही़

अकलूज : पीडित महिलांना वैद्यकीय, पोलीस आणि कायदेविषयक मदत करण्यासाठी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत मिळणारे वन स्टॉप सेंटर सोलापूर येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १८ रोजी सोलापूर येथे बैठकीचे आयोजन केल्याची माहिती खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. या संदर्भात खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ नारायण पाटील, जि़ प़ सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयकुमार खोमणे, पर्यवेक्षक नितीन जाधव, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी नितीन थोरात यांची गुरुवारी अकलूज येथे बैठक झाली. येथील डॉटर मॉम फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्याकडे महिलांसाठी या तीन मागण्या केल्या होत्या. मनेका गांधी यांनी या तीन योजना देण्याचे मान्यही केले आहे. पीडित महिलांना न्याय व आधार देण्यासाठी असलेली वन स्टॉप सेंटर ही योजना जिल्ह्याच्या ठिकाणी असावी, असे निकष आहेत.  निराधार महिलांना आधार देणारे शेल्टर होम करमाळा येथे सुरु करण्यात येणार असल्याचे खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. वर्किंग वुमेन होस्टेल कोठे सुरु करायचे या संदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही़ या योजनांचे प्रस्ताव तयार करणे व त्या संबंधित निर्णय घेण्यासाठी १८ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. राज्यातील ३६ पैकी ९ जिल्ह्यात हे सेंटरकाय आहेत अटी.......- वन स्टॉप सेंटरसाठी ३५०० चौरस फूट जागेची गरज असून, राज्यातील ३६ पैकी केवळ ९ जिल्ह्यात असे सेंटर सुरु आहे. इमारतीसाठी ३७ लाखांचा निधी केंद्राकडून मिळणार आहे़ ३० महिला क्षमतेच्या शल्टर होमच्या इमारतीसाठी ४० लाखांचा निधी मिळतो. ३० महिलांच्या पोषणासाठी प्रतिवर्षी नऊ लाख व त्यातील स्टाफसाठी साडेपाच लाख मिळतात.केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाची योजना आहे.  महाराष्ट्रात केवळ नऊ जिल्ह्यात असे सेंटर उपलब्ध आहेत़ खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून सोलापुरात हे सेंटर सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.- शीतलदेवी मोहिते-पाटील,अध्यक्ष, डॉटर मॉम फाउंडेशन, अकलूज 

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील