शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

एका क्लिकवर उत्तरपत्रिका तपासण्याची सर्व माहिती मिळणार; सोलापूर विद्यापीठाच्या 'डॅशबोर्ड'चे उद्घाटन

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: July 4, 2023 17:44 IST

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सदरील परीक्षा विभागाचे डॅशबोर्ड आता सर्वांना पहावयास मिळणार आहे.

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून विविध अभ्यासक्रमांचे निकाल वेळेत व लवकर जाहीर करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या माहिती संदर्भातील 'डॅशबोर्ड'चे उद्घाटन मंगळवारी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते झाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सदरील परीक्षा विभागाचे डॅशबोर्ड आता सर्वांना पहावयास मिळणार आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सदरील डॅशबोर्डचे उद्घाटन मंगळवारी झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शाह आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी केले.

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून निर्मिती करण्यात आलेल्या या डॅशबोर्डमध्ये जमा झालेल्या उत्तरपत्रिकांची संख्या, स्कॅनिंग झालेल्या उत्तरपत्रिकांची संख्या, मूल्यमापन होत असलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या, उत्तरपत्रिका तपासत  असलेल्या प्राध्यापकांची संख्या, तपासणी पूर्ण झालेल्या व राहिलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या इत्यादी सर्व माहिती या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबर विषय, अभ्यासक्रम निहाय उत्तरपत्रिकांची माहिती मिळणार असल्याने निकाल लवकर लावण्यासाठी या डॅशबोर्डची खूप मोठी मदत परीक्षा विभागास होणार असल्याचा विश्वास प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी यावेळी व्यक्त केला.