शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात माघ वारी; भाविकांच्या सुरक्षेसाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी

By appasaheb.patil | Updated: January 31, 2023 19:28 IST

पंढरपुरात माघ वारीनिमित्त भाविकांच्या सुरक्षेसाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. 

सोलापूर : माघ यात्रा सुरक्षित व निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कालावधीत  भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहे. शिवाय वारकरींच्या वेशात शेकडो पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भाविकांना सरंक्षण देण्यासाठी, चोरी रोखण्यासाठी  वारकरी वेषात  पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत. तर १२५ सीसीटिव्ही कॅमेरॅच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जात आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

माघ शुध्द एकादशी बुधवार १ फेब्रुवारी २०२३ रोजी असून, या यात्रेचा कालावधी २६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी असा आहे. या यात्रा कालावधीत श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यात्रा कालावधीत  येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वछता व सुरक्षेला प्रशासनाने प्राधान्य दिले असून, भाविकांच्या मदतीसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती  प्रातांधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

माघी वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर  आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने  कोणतेही गैरसोय येऊ नये  यासाठी  पत्राशेड, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर या चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे.तसेच चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी भाविक मोठ्या प्रमाणात जातात त्यांच्या सुरक्षेसाठी   आपत्ती व्यवस्थानतर्गंत दोन यांत्रिक बोटी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह तैनात ठेवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

पंढरपुरात २२७ दिंड्या दाखलमाघी यात्रेच्या कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या दिंड्याना मुक्कामासाठी तसेच भजन किर्तनासाठी प्रशासनाकडून मोफत जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ६५ एकरमध्ये ४३५ प्लॉटचे वाटप झाले असून, २२७ दिंड्या विसावल्या आहेत. तसेच  ३ लाख ३८ हजार २२७ भाविकांची नोंदणी केली असून,सध्या १ लाख १० हजार भाविक दाखल झाले आहेत.  ६५ एकरमध्ये भाविकांसाठी नगरपालिका प्रशासनाकडून   पिण्याचे शुद्ध पाणी,लाईट, सुरक्षा, आरोग्य,शौचालय आदी आवश्यक सुविधा उलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या मदतीसाठी  व आवश्यक  सेवा सुविधा देण्यासाठी येथे आपत्काली  मदत केंद्र २४ तास कार्यरत ठेवण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर