शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ढाबा अन् हॉटेलवर दारू पिणाऱ्यानी एक्साईजच्या टीमला पाहताच काढला पळ

By appasaheb.patil | Updated: December 13, 2022 13:11 IST

नऊ मद्यपींसह दोन हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हे दाखल; न्यायालयाने ठोठावला ६८ हजारांचा दंड

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरातील अक्कलकोट रोड व बार्शी रोडवरील धाब्यांवर अचानक छापा टाकून धाबा चालकांसह त्या ठिकाणी दारू पिताना आढळून आलेल्या नऊ मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या पथकाने सोलापूर-बार्शी रोडवरील भोगाव गावाच्या हद्दीतील हाॅटेल गावरान तडका या ठिकाणी छापा टाकून मालक बलभीम शिवाजी तांबे (रा. अंबिकानगर, बाळे) यांच्यासह मद्यपी ग्राहक सोमनाथ बसवराज चौगुले, अनिल तायाप्पा तांबे, नागनाथ रामलिंग कल्याणकर, परमेश्वर चंद्रकांत माने व परमेश्वर हरिश्चंद्र शेळके यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अक्कलकोट रोड शांती चौक येथील हाॅटेल दीपक या धाब्यावर छापा टाकून चंद्रकांत रामण्णा साळुंखे (रा. रविवार पेठ) या हाॅटेल मालकासह त्या ठिकाणी दारू पित बसलेले संगमेश्वर राठीमाणी, प्रकाश चव्हाण, चिदानंद बिराजदार व रमेश चव्हाण यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, सुनील कदम, दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे, सुनील पाटील, उषाकिरण मिसाळ, गणेश उंडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान प्रियंका कुटे, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट, प्रकाश सावंत व वाहनचालक रशीद शेख व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.

एका दिवसात आरोपपत्र दाखल...सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (अ) (ब) व ८४ नुसार गुन्हा दाखल करून गुन्ह्याचे तपास अधिकारी यांनी १२ डिसेंबला एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले असता दारूबंदी न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी नम्रता बिरादार, यांनी तत्काळ निकाल देत दोन्ही ढाबाचालकांना प्रत्येकी २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार असा एकूण ६८ हजारांचा दंड ठोठावला आहे.