शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

सोलापूरातील एनटीपीसीने निर्माण केली ३१८ दशलक्ष युनिट वीज, विजेचा व्यावसायिक वापर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 15:02 IST

फताटेवाडी येथील सोलापूर सुपर पॉवर थर्मल कॉर्पोरेशन अर्थात एनटीपीसीने प्रत्यक्ष वीज उत्पादन सुरू केले असून गेल्या दोन महिन्यात ३१८ मिलियन युनिट वीज उत्पादन झाले आहे. या विजेचा व्यावसायिक वापर सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देएनटीपीसीने फताटेवाडी येथे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली.६६० मेगावॅटच्या दोन संयंत्रातून १३२० मेगावॅट वीज उत्पादनमार्च २०१६ पासून वीजनिर्मिती करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाचे काम हातीयंत्रसामुग्री खरेदीची निविदा प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात

नारायण चव्हाण सोलापूर दि १४ : फताटेवाडी येथील सोलापूर सुपर पॉवर थर्मल कॉर्पोरेशन अर्थात एनटीपीसीने प्रत्यक्ष वीज उत्पादन सुरू केले असून गेल्या दोन महिन्यात ३१८ मिलियन युनिट वीज उत्पादन झाले आहे. या विजेचा व्यावसायिक वापर सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.एनटीपीसीने फताटेवाडी येथे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली .६६० मेगावॅटच्या दोन संयंत्रातून १३२० मेगावॅट वीज उत्पादन करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात मार्च २०१६ पासून वीजनिर्मिती करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. मात्र त्यात अनेक अडचणी आल्या. यंत्रसामुग्री खरेदीची निविदा प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकली. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण तब्बल सव्वा वर्ष प्रलंबित राहिल्याने प्रकल्पाची उभारणी रेंगाळली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी निविदा भरल्याने अत्याधुनिक, दर्जेदार यंत्रसामुग्री घेण्याचे धोरण उपयुक्त ठरले.पहिल्या संयंत्रातून वीजनिर्मितीचे काम पूर्णत्वास आल्याने २१ आॅगस्टपासून चाचणी सुरू झाली. सलग ७२ तास पूर्ण क्षमतेने संयंत्र चालवण्यात आल्यानंतर २४ आॅगस्ट रोजी ही पहिली चाचणी यशस्वी ठरली. त्यानंतरही तांत्रिक अडचणींवर मात करीत दि. २५ सप्टेंबरपासून उत्पादित केलेल्या विजेचा सीओडी (कमर्शिअल आॅपरेट डिक्लेरेशन अर्थात व्यावसायिक संचालन घोषणा पत्र) मंजूर झाला. आतापर्यंत ३१८  मिलियन युनिट विजेचे उत्पादन आणि वापर करण्यात आला आहे.पहिल्या संयंत्राची यशस्वी वीजनिर्मिती सुरू झाली असून येत्या ४ ते ५ महिन्यात दुसरे संयंत्र कार्यान्वित होणार आहे. कदाचित मार्च २०१८ मध्ये दोन्ही युनिट मिळून १३२० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रकल्पाचे महाप्रबंधक प्रकाश तिवारी यांची दिल्ली येथे बदली करण्यात आली असून सध्या हे पद रिक्त आहे. लवकरच नव्या महाप्रबंधकाची नियुक्ती अपेक्षित आहे.--------------------महाराष्ट्राला ५० टक्के वीज उपलब्ध- फताटेवाडीच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून उत्पादित केलेली ५० टक्के वीज महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहे. मध्यंतरी कोराडी, पारस या वीजनिर्मिती प्रकल्पाला इंधनाअभावी वीजनिर्मिती करता आली नाही. या काळात फताटेवाडीच्या प्रकल्पातून उत्पादित झालेल्या विजेने राज्याची गरज भागवली.--------------- एक मिलियन युनिट म्हणजे १० लाख युनिट, याप्रमाणे आतापर्यंत ३१८ कोटी युनिट वीज उत्पादित झाली असून तिचा व्यावसायिक वापर करण्यात आला आहे. उत्पादित केलेली वीज लिंबीचिंचोळी येथील पॉवर ग्रीडला जोडण्यात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण