शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आता शाबासकीची थाप कोण मारणार ?

By admin | Updated: June 4, 2014 00:34 IST

संघर्षयात्रा संपली : भाजप कार्यकर्त्यांच्या भावना अनावर

 सोलापूर :भल्या सकाळी गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची बातमी सोलापुरात येऊन धडकली आणि तमाम भाजप कार्यकर्त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. पक्षाच्या बांधणीसाठी १९८५ पासून सोलापूरला सतत येणार्‍या गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी जुने आणि नवे कार्यकर्ते भावनाविवश झाले. या भावनांच्या कल्लोळात अनेक जुन्या कार्यकर्त्यांना मुंडेंच्या करारी, धाडसी पण प्रेमळ वागणुकीची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. खांद्यावर हात टाकून आपुलकीनेपाठीवर शाबासकीची थाप मारणार्‍या या नेत्याला काळाने अचानक नेल्याने कार्यकर्त्यांना आता लढण्याचे बळ कोण देणार, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत. राष्टÑीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाची विचारधारा मानणारे पश्चिम महाराष्टÑातील एकमेव शहर म्हणून सोलापूरची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे. यानंतर स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाला मानणारा एक वर्ग येथे मोठ्या प्रमाणावर तयार झाला़ याचे श्रेय गोपीनाथ मुंडे यांना जाते. १९८९ साली प्रमोद महाजन यांनी राष्टÑीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर महाराष्टÑातील भाजपाची संपूर्ण जबाबदारी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आली. सोलापूर हे शहर तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने याठिकाणी पक्षाची अनेक अधिवेशने, सभा आणि बैठका झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून सोलापूरमध्ये कै. बाबासाहेब तानवडे, कै. लिंगराज वल्याळ, कै. इक्बाल रायलीवाला, कै. राचप्पा येलशेट्टी, कै. बिपीनभाई नाईकवाडी, कै. बटुकाका मोहोळकर, कै. जवाहर पाटील, कै.विष्णुपंत बेंबळेकर, रत्नाकर बेंबळेकर, पंचप्पा कल्याणशेट्टी, सुरेश जोशी, डॉ. दिलीप कुलकर्णी, प्रमोद वाघमोडे, दिलीप जाधव, सुभाष पाटील, संजीवनी पाटील, शंकर वाघमारे, सुरेशचंद्र देशमुख, शिवाजी सोनार, श्रीकंठ स्वामी, विष्णू जगताप, दत्तात्रय इनामदार, व्यंकटेश कुलकर्णी, सुरेश लांडे, राधाकृष्ण पाटील, अनंतराव पवार, विठ्ठलराव भणगे, शिवाजीराव गायकवाड, प्रा. विजय शेटे, गोविंदराव कुलकर्णी, काशिनाथ थिटे, किशोर देशपांडे, प्रभाकर जामगुंडी, विश्वनाथ बेंद्रे, छोटुभाई लोहिया, सुरेश हणमे, विठ्ठल सूर्यवंशी, रामचंद्र जन्नू, शिवशरण दारफळे हे जुने कार्यकर्ते काम करायचे. या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परळीहून मुंडे महिन्यातून एकदा तरी यायचे. पक्षाची भूमिका आणि ओळख शहर आणि ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते जिल्हाभर फिरायचे. मिळेल त्या दुचाकी वाहनाने कधी बाबासाहेब तानवडे, कधी वल्याळ, कधी देशपांडे, कधी बेंद्रे या कार्यकर्त्यांना घेऊन ते जिल्हाभर फिरून आपल्या पक्षाची भूमिका मांडायचे. नवखा पक्ष आणि प्रचारासाठी लागणारी आर्थिक मदत पाच-दहा रुपयांच्या स्वरूपात कार्यकर्त्यांकडून गोळा करून महाजन आणि मुंडे जिल्ह्यात पक्षाचा प्रचार आणि प्रसार करायचे. गावागावांत फिरून भाजपाची उभारणी करणार्‍या मुंडे यांच्या परिश्रमाला १९९५ साली फळ आले आणि पश्चिम महाराष्टÑातील पहिला आमदार सोलापुरातून लिंगराज वल्याळ यांच्या रूपाने भाजपाला मिळाला. मुंडे यांनी सोलापूरला सातत्याने येऊन कार्यकर्त्यांचा मोठा समूह निर्माण केल्याने सोलापुरातील शहर उत्तर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनला तो कायमचाच. आजही हा मतदारसंघ आ. विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने भाजपच्याच ताब्यात आहे. ९५ साली राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आली आणि मुंडे उपमुख्यमंत्री झाले. परंतु अशाही वेळी त्यांचे सोलापूरवरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. बाबासाहेब तानवडे आणि लिंगराज वल्याळ या सोलापूरच्या दोन कार्यकर्त्यांना त्यांनी दोन पदे दिली. तानवडे यांना हातमाग विकास महामंडळ तर वल्याळ यांना पश्चिम महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या प्रचार-प्रसाराचे पूर्ण श्रेय गोपीनाथ मुंडे यांनाच जाते. ठराविक वर्गाचा पक्ष म्हणून असलेली भाजपची ओळख त्यांनी पूर्णपणे पुसून बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख निर्माण केली. या प्रक्रियेत अनेक जुन्या कार्यकर्‍र्यांना संधी मिळाली नाही. यामुळे थोडी नाराजीही निर्माण झाली. पण त्यांनी उभे केलेले कार्यकर्ते मुंडेंना सोडून गेले नाहीत. १९९९ नंतर पक्षाला सत्तेत येण्यासाठी पंधरा वर्षे लागली परंतु सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एकही कार्यकर्ता मुंडेंपासून दूर गेला नाही. परळी आणि अंबाजोगाई जशी गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी तसेच प्रेम त्यांनी सोलापूरवरही केले. इथल्या कार्यकर्त्यांनी पाठविलेल्या निमंत्रणाचे मुंडे यांनी नेहमीच स्वागत केले. येथे आल्यानंतर त्यांना स्वत:च्या गावात आल्याचा आनंद होत असल्याच्या आठवणी जुन्या कार्यकर्त्यांनी सांगितल्या.

---------------------------

सोलापूरच्या आठवणी....

चटणी-भाकरी अन् पिठलं १९८२ पासून मुंडे सोलापूरला यायचे. कधी सभा, कधी अधिवेशन, बैठक अशा कारणांसाठी आलेले मुंडे त्या काळी कधीच हॉटेलमध्ये जेवले नाहीत. कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन चटणी, भाकरी आणि पिठलं असे अस्सल मराठवाडी जेवण मुंडेंना आवडायचे.

--------------------------

 

जीपमधून दौरा

सोलापूर शहर रेल्वेने देशभर जोडलेले असल्याने भारतीय जनता पक्षातील इतर राज्यांतील नेते सोलापूरला यायचे. अशा वेळी मुंडे परळीहून जीपमध्ये स्वत: ड्रायव्हिंग करीत सोलापूरला यायचे.

------------------------

शिंदे यांच्याकडून स्वागत

मुंडे यांचा उमदा स्वभाव आणि मित्र जोडण्याची हातोटी एवढी प्रसिद्ध होती की १९८६ साली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा सोलापूरला होता. येथे आल्यानंतर त्यावेळी राज्याचे मंत्री असलेले सुशीलकुमार यांनी विश्रामगृहात त्यांचे स्वागत केले आणि त्यांना आपल्या शेतात हुरडा पार्टीची मेजवानी दिली.  

----------------------------------------

 

पोस्ट कार्डावर निमंत्रण

गोपीनाथ मुंडे यांचा प्रज्ञा यांच्यासमवेत विवाह ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसाठी लग्नपत्रिका छापण्यात आल्या नाहीत. स्वत: प्रमोद महाजन यांनी १५ पैशाच्या पोस्टकार्डवर कार्यकर्त्यांना या लग्नाचे निमंत्रण पाठविल्याची आठवण विश्वनाथ बेंद्रे यांनी सांगितली.

-----------------------

कार्यकर्त्यांना दिलासा

 

मुंडे यांच्या मैत्रीच्या उपमा सगळीकडे दिल्या जातात. एकदा त्यांचे सूत एखाद्याशी जुळले की ते जन्मभर अभेद्य राहायचे. सोलापुरात त्यांच्यासमवेत काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या सुखदु:खात ते आवर्जून यायचे.