शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विकास सोसायट्यांवर आता निबंधकांचे नियंत्रण, काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व संपविण्याचा डाव ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 06:10 IST

सहकार खात्याच्या शुद्धीकरणात आता विकास सोसायट्यांच्या सचिवांवर वर्चस्व राहण्यासाठी ‘केडर’(जिल्हा देखरेख संघ) रद्द करण्यात येत असून, जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीच्या ताब्यात कारभार दिला जाणार आहे.

अरुण बारसकर सोलापूर : सहकार खात्याच्या शुद्धीकरणात आता विकास सोसायट्यांच्या सचिवांवर वर्चस्व राहण्यासाठी ‘केडर’(जिल्हा देखरेख संघ) रद्द करण्यात येत असून, जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीच्या ताब्यात कारभार दिला जाणार आहे. वैद्यनाथन् समितीच्या शिफारशींचा आधार घेत ही कार्यवाही केली जात आहे.राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अंतर्गत विकास सोसायट्यांमार्फत शेतकºयांना कर्ज वाटप केले जाते. त्यासाठी गावपातळीवर चेअरमन व पंचसमिती असली तरी सचिव हा सर्वात मोठा घटक आहे.या सचिवावर जिल्हा बँकांचे पर्यायाने बँकांच्या संचालकांचे वर्चस्व असते. राज्यभरातील जिल्हा बँकांवर त्या-त्या तालुक्यातील काँग्रेस-राष्टÑवादीचे नेतेच अनेक वर्षांपासून संचालक आहेत.सचिवांच्या एकूणच वेतन व कामकाजासाठी सध्या ‘केडर’ अस्तित्वात आहे. विकास सोसायट्यांकडून सचिवाच्या वेतनाच्या सव्वापट रक्कम दरवर्षी ‘केडर’ला जमा केली जाते. सोसायट्यांच्या पैशातून सचिवांचा पगार, भत्ते दिले जातात. त्या-त्या जिल्हा बँकांचे अध्यक्ष हे केडरचे पदसिद्ध अध्यक्ष तर तीन संचालक चक्रानुक्रमे सदस्य असतात.वैद्यनाथन् समितीच्या शिफारशीनुसार ६९ (ख) कलमान्वये जिल्हा बँकेच्या अध्यक्षतेखालील केडरऐवजी जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील समितीची जिल्हास्तरीय समिती अस्तित्वात आणता येते.या कायद्याचा आधार घेत राज्यातील जिल्हा बँकांच्या वर्चस्वाखालील केडरचे अस्तित्व संपविण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी जिल्हा बँकांना जिल्हा उपनिबंधकांकडून नोटीसा दिल्या जात आहे.>सचिवांवर राहणार डीडीआरचे नियंत्रणरद्द झाल्यानंतर जिल्हास्तरीय समितीच्या अंतर्गत सचिवांचे कामकाज होणार असून, उपनिबंधक अध्यक्ष, विशेष लेखाधिकारी, सचिवांचे दोन प्रतिनिधी, संघटनेचे दोन प्रतिनिधी हे सदस्य तर बँकेचे व्यवस्थापक हे सचिव म्हणून कामकाज पाहणार आहेत.>सोलापूरसह राज्यातील सक्षम जिल्हा बँकांनी सचिवांची जबाबदारी घेण्याबाबतचे ठराव उपनिबंधकांना दिले आहेत. या ठरावांचा विचार न करता कायद्याचा आधार घेतला जात असून त्याला न्यायालयात आव्हान देणार आहोत.- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक