शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कमी दर दिल्याचा ठपका ठेवत पुणे विभागातील ११ दूध संघांना कारवाईच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 11:06 IST

शासकीय आदेशाचे पालन न करता दोन रुपये व त्यापेक्षा कमी दर दिल्याचा ठपका ठेवत पुणे विभागातील ११ दूध संघांना नोटिसा दिल्या आहेत. या नोटीसनुसार संचालक मंडळ व संस्था कर्मचाºयांवरही कारवाई होऊ शकते.

ठळक मुद्दे या नोटीसनुसार संचालक मंडळ व संस्था कर्मचाºयांवरही कारवाई होऊ शकतेराज्यात सध्या दूध खरेदीचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले सहकारी व मल्टिस्टेट संघापेक्षा खासगी संघांची संख्या व संकलन अधिक

अरुण बारसकरसोलापूर दि ८ : खासगी संघ गाईच्या दुधाला प्रतिलिटर २० रुपये शेतकºयाच्या हातात टेकवत असताना काहीच करू शकत नाही, असे हताशपणे सांगणाºया यंत्रणेने शासकीय आदेशाचे पालन न करता दोन रुपये व त्यापेक्षा कमी दर दिल्याचा ठपका ठेवत पुणे विभागातील ११ दूध संघांना नोटिसा दिल्या आहेत. या नोटीसनुसार संचालक मंडळ व संस्था कर्मचाºयांवरही कारवाई होऊ शकते.राज्यात सध्या दूध खरेदीचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. सहकारी व मल्टिस्टेट संघापेक्षा खासगी संघांची संख्या व संकलन अधिक आहे. खासगी दूध संघाने शासनाचा आदेश पाळला नाही तर कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार कोणालाच नाही. मल्टिस्टेट संघांनीही शासन आदेशाचे पालन नाही केले तर कारवाई करण्याचा अधिकार राज्यात कोणाला नाही. मात्र केंद्राकडे कारवाईसाठी अहवाल पाठविण्याची तरतूद आहे. दूध दरवाढ, शेतीपिकांना हमीभाव, संपूर्ण कर्जमाफीच्या विषयावरून राज्यातील शेतकरी संपावर गेल्यानंतर राज्य शासनाने गाय व म्हशीच्या दुधाचा खरेदी दर तीन रुपयांनी वाढविला होता. ही दरवाढ फक्त सहकारी दूध संघांनी देणे बंधनकारक आहे. पुणे विभागात जवळपास ६५ टक्के दूध खासगी संघ स्वीकारत असून ते गाईच्या दुधाला २१ व २० रुपयांचे दर देत आहेत. शासनाने जाहीर केल्यापासून कोणत्याही खासगी संघाने प्रति लिटर २७ रुपये दर दिला नाही. मात्र शासन याबाबत कोणतीही कारवाई करीत नाही. एकीकडे खासगी दूध संघ शेतकºयांच्या हातावर प्रति लिटर २० रुपये टेकवत असताना शासनाचा दुग्धविकास विभागाने कमी दर दिल्याचा ठपका ठेवत ११ सहकारी संघांवर कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. पुणे विभागात सहकारी २३ संघ आहेत. -------------------गोकूळसह ११ संघांना नोटिसा...च्पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज)ने गाईच्या दुधाला प्रति लिटर २२ रुपये ७० पैसे तर बारामती तालुका दूध संघाने प्रति लिटर २१ रुपये ५० पैसे दर शेतकºयांना दिला आहे. कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकूळ), सातारा जिल्हा दूध संघ, कोयना सहकारी दूध संघ कराड, पाटण तालुका दूध संघ पाटण, फलटण तालुका दूध संघ, मोहोनराव पाटील दूध संघ मिरज, सोनहिरा दूध संघ कडेगाव, लोकनेते हणमंतराव पाटील दूध संघ विटा, वसंतदादा पाटील जिल्हा दूध संघ तासगाव या ९ सहकारी संघांनी प्रति लिटर २५ रुपयांचा दर शेतकºयांना दिला असल्याने कारवाईच्या नोटिसा सर्व ११ संघांना बजावल्या आहेत. --------------------- कलम ७९ अ (३) व ब अन्वये कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये विभागीय उपनिबंधक (दुग्ध), पुणे यांनी म्हटले आहे.- कलम ७९ अ अन्वये या बाबीला संचालक मंडळ जबाबदार          असेल तर अपात्र करण्याची तरतूद आहे.- कलम ७९ ब अन्वये या बाबीला संस्थेचा संबंधित सेवक जबाबदार असेल तर त्याला काढून टाकण्याची तरतूद आहे.- १० दिवसात खुलासा देणे अपेक्षित असून त्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. ----------------सोलापूर जिल्हा दूध संघ व शिवामृतने शासन आदेशाप्रमाणे दर दिल्याने कारवाईचा प्रश्नच येत नाही. मल्टिस्टेटने कमी दर दिला तर अहवाल केंद्राला पाठविण्याचा अधिकार आहे, मात्र खासगी संघावर काहीही कारवाई करू शकत नाही. - सुनील शिरापूरकर,विभागीय उपनिबंधक (दुग्ध)