शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाहन कागदपत्रे वैधतेची सूचना केवळ साईटवरच; दंडाची प्रक्रिया सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 11:29 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार’ लॉकडाऊनमध्ये परवाने नूतनीकरणाबाबत संभ्रमावस्था

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात वाहतूक शाखा आणि आरटीओकडून वाहनांवर कारवाई सुरूकाहींचा इन्शुरन्स संपला तर काहींचा पीयूसी कालावधी संपलेला होताजड वाहन चालकाने वाहन परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : लॉकडाऊन काळात वाहन कागदपत्रे नूतनीकरण करण्याची सक्ती नसून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वैध समजण्याबाबत शासनाने काढलेली अधिसूचना ही बाजूला पडली आहे. तिची अंमलबजावणी होत नाही. एम परिवहनची साईट अपडेट होत नसल्याने वाहतूक शाखेकडून दंडाची प्रक्रिया सुरूच आहे. तसेच अ‍ॅपवर जाऊन कागदपत्रे नियमित व नूतनीकरणासाठी प्रयत्न करता त्यावर प्रथम दंड आकारणी होते, मगच अर्जासोबतची कागदपत्रे पुढे सरकत आहेत.

लॉकडाऊन काळात वाहतूक शाखा आणि आरटीओकडून वाहनांवर कारवाई सुरू झाली. काही वाहने पोलीस ठाण्यात तर काही वाहने आरटीओ कार्यालय आणि नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर लावली गेली. तब्बल महिनाभर ही वाहने पडून होती. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर ती सोडवण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र या काळात सर्व कागदपत्रे तपासूनच वाहने सोडली. काहींचा इन्शुरन्स संपला तर काहींचा पीयूसी कालावधी संपलेला होता. काहींच्या लायसन्सची मुदतही या काळात संपून गेली होती. 

दरम्यान, या शासकीय कार्यालयातील गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पाच ते १५ टक्के कर्मचाºयांवर सध्या कारभार सुरू आहे. या काळात आरटीओमध्ये गर्दी होऊ नये म्हणून कागदपत्रे आणि लायसन्स १ फेब्रुवारी २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या काळापर्यंत वैध समजावीत, अशी अधिसूचना शासनाने काढली आहे. मात्र तशी दुरुस्ती या साईटवर झालेली नाही. परिणामत: चौकाचौकात तपासणी मोहिमेदरम्यान पकडलेल्या वाहनांची कागदपत्रे तपासली जात आहेत़ त्यावर दंडाची प्रक्रिया सुरू आहे. ही अधिसूचना केवळ साईटवर चिकटून राहिली आहे. 

या साईटवर दुचाकीस्वार अथवा चारचाकी व जड वाहन चालकाने वाहन परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला तर प्रथम दंड आकारणी होते, त्यानंतर ठरलेले शुल्क घेतले जाते. याचा फटका वाहनधारकांना बसतोय. दंड व कागदपत्रे तपासणारी यंत्रणा मात्र या सूचना पाळत नाहीत.

नव्या लायसन्ससाठी वेटिंग पिरियड वाढला...

  • - सध्या दहावी आणि बारावीचा निकाल लागला आहे. बहुतांश विद्यार्थी दुचाकी आणि चारचाकी लायसन्ससाठी आॅनलाईन प्रक्रिया पार पडत आहेत. तिकडे कमी मनुष्यबळावर काम चालवावे लागत असल्याने दुचाकी नवीन लायसन्ससाठी आॅक्टोबर महिन्यानंतरच्या तारखा मिळत आहेत. 
  • - सप्टेंबरपर्यंत ट्रेनिंग स्कूल बंद असल्याने चारचाकींचे नवे लायसन्सही बंद आहेत. लायसन्स नूतनीकरणासाठी आॅनलाईन अर्ज घेतला जातो़ मात्र कार्यालयात हार्ड कॉपी घेताना दोन महिन्यांचा वेटिंग पिरियड मिळतोय़ दररोज या काळात दुचाकीचे जवळपास पंधरा लायसन्स वितरित होताहेत.

एम. परिवहन अ‍ॅप साईटला काही तांत्रिक अडचणी उद्भवलेल्या दिसत आहेत़ या अडचणी समजून घेतोय़ वरच्या पातळीवर दुरुस्तीबाबत प्रयत्न सुरू आहेत़ - संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 

एम. परिवहनच्या अ‍ॅपवर सर्व प्रकारचे लायसन्स आणि इतर परवाने ही ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वैध मानण्याच्या सूचना आहेत़ आरटीओ आणि वाहतूक पोलीस ते मानत नाहीत़ एम़  साईट अपडेट करण्यासाठी महिनाभरापासून जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे पाठपुरावा करतोय. तरीही अपडेट होत नाही.-सलीम मुल्ला, राज्य सचिव सिटू 

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसroad transportरस्ते वाहतूकdigitalडिजिटल