शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशानंतर ‘सुशील रसिक’ला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:37 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सुशील रसिक’ सभागृहाच्या व्यवस्थापनाला वाढीव केलेले बेकायदा बांधकाम स्वत:हून पाडून टाकण्याबाबत मनपाने नोटीस बजावली आहे

सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सुशील रसिक’ सभागृहाच्या व्यवस्थापनाला वाढीव केलेले बेकायदा बांधकाम स्वत:हून पाडून टाकण्याबाबत मनपाने नोटीस बजावली आहे. बेकायदा बांधकाम प्रकरणी न्यायालयाने माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला होता.‘सुशील रसिक’ सभागृहाचे बांधकाम करताना मनपाने मंजूर केलेल्या परवान्यापेक्षा १0 टक्के जास्त बांधकाम करण्यात आले. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या काळात झालेल्या या प्रकाराबाबत विजयकुमार महागावकर यांनी तक्रार केली होती.या तक्रारीवर गुडेवार यांनी सभागृहाच्या बांधकामाचे मोजमाप घेण्याचे आदेश दिले होते. मोजमापात १0 टक्के जादा बांधकाम झाल्याचे आढळल्यावर महानगरपालिकेने नोटीस बजाविली. त्याला स्थगिती मिळविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे अपील करण्यात आले. त्यावर मनपाचे म्हणणे घेऊन स्थगिती देण्यात आली. दरम्यान, गुडेवार यांची बदली झाली. नंतर आयुक्त विजयकुमार काळम यांच्या कारकिर्दीत स्थगितीवर काहीच हालचाल न झाल्याने महागावकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.या याचिकेवर गेल्या आठवड्यात सुनावणी होऊन न्यायालयाने बेकायदा बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ही नोटीस बजाविल्याची माहिती नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी दिली.या नोटिसीनंतरही बेकायदेशीर बांधकाम व्यवस्थापनाने काढून टाकले नाही तर महापालिका कारवाई करून ते काढून टाकेल, असेही चलवादी यांनी सांगितले.