शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

२१ मार्चपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन गुण पाठविण्याच्या महाविद्यालयांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 12:45 IST

सोलापूर विद्यापीठाच्या विविध परीक्षांचा निकाल जाहीर होत असताना, दुसरीकडे मार्च/एप्रिल महिन्यातील सत्र २,४,६ आणि ६ च्या परीक्षा २१ मार्च २0१८ पासून सुरू होत आहेत.

ठळक मुद्देसर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेशी संबंधित असलेले अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठवून देण्याच्या सूचना महाविद्यालयांना करण्यात आल्याविद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयातील व विद्यापीठ परिसर मिळून सुमारे ९0 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून परीक्षा वेळेत घेणे, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल लावणे आदी कामाचेही नियोजन परीक्षा विभागाच्या वतीने करण्यात आले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : सोलापूर विद्यापीठाच्या विविध परीक्षांचा निकाल जाहीर होत असताना, दुसरीकडे मार्च/एप्रिल महिन्यातील सत्र २,४,६ आणि ६ च्या परीक्षा २१ मार्च २0१८ पासून सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेशी संबंधित असलेले अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठवून देण्याच्या सूचना महाविद्यालयांना करण्यात आल्या आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात होणाºया परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले आहे. दि.२१  मार्चपासून बी.ए.,बी.कॉम., दि.२८ मार्च - बी.एस्सी.अ‍ॅन्ड बी.एस्सी(बायोटिच, एनर्टपी व ई.सी.एस.). दि.१८ एप्रिलपासून एम.ए.,एम.कॉम., एमएसडब्लू. दि. १२ एप्रिल - बी.बी.ए.,बी.सी.ए., दि.३ मे - एम.बी.ए., एफ.ई.,एस.ई.,टीई.बीई. दि.१८ एप्रिल - बी.ए., एल.एल.बी., एल.एल.एम., पी.जी.डी.सी.ए.डीबीएम., दि.३ मे -एम.सी.ए.कॉमर्स, दि.१८ एप्रिल-एम.एस्सी., एम.सी.ए. (शास्त्र), एम.ए.(कॅम्पस) दि.३ मे-एम.ई.एम.फार्मा, दि.३ मे-एमस्सी.ए.इंजि., बी.अ‍ॅर्कालॉजी, बी.फार्मा, दि.३ मे- बी.एड., एम.एड., बी.पीएड., एम.पीएड. या परीक्षांना सुरुवात होणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ११८ महाविद्यालयांना अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठविण्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व सामाजिक शास्त्रे यांचा समावेश आहे. सीजीपीए/सीबीसीएस पॅटर्न अंतर्गत ३0 गुणांचे अंतर्गत मूल्यमापनाचे कामकाज महाविद्यालयीन स्तरावर केले जाते. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन स्तरावर मूल्यमापन करणे आवश्यक असते. या मूल्यमापन अंतर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर ३0 गुण देण्यात येतात. विद्यार्थ्यांचे वर्तन, फिल्डवर्क, ग्रुप  चर्चा अशा विविध पातळीवर वारंवार मूल्यमापन केले जाते. -----------------------च्सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयातील व विद्यापीठ परिसर मिळून सुमारे ९0 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून परीक्षा वेळेत घेणे, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल लावणे आदी कामाचेही नियोजन परीक्षा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर