शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

बोलणेचि नाही । आता देवाविण काही ।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:58 IST

मनुष्य देहाची इंद्रिये ही भगवंत प्राप्तीची साधने आहेत. ‘जेणे तु जोडसी नारायण’ असे संतवचन प्रसिद्ध आहे. यामध्ये ‘वाचा’ हे एक असे साधन आहे की, त्यातून निघालेल्या प्रत्येक शब्दाने आपला व्यावहारिक व आध्यात्मिक विकास होतो आहे. या वाचेलाच वाणी, बोलणं, असे पर्यायी शब्द आहेत. आपण काय बोलतो, हे महत्त्वाचे असते. कारण ...

मनुष्य देहाची इंद्रिये ही भगवंत प्राप्तीची साधने आहेत. ‘जेणे तु जोडसी नारायण’ असे संतवचन प्रसिद्ध आहे. यामध्ये ‘वाचा’ हे एक असे साधन आहे की, त्यातून निघालेल्या प्रत्येक शब्दाने आपला व्यावहारिक व आध्यात्मिक विकास होतो आहे. या वाचेलाच वाणी, बोलणं, असे पर्यायी शब्द आहेत. आपण काय बोलतो, हे महत्त्वाचे असते. कारण आपल्या बोलण्यातून एक सामाजिक वातावरण तयार होत असते. संत तुकाराम महाराज या संबंधात दोन भूमिका व्यक्त करतात. एक तर या वाणीने कसलेच बोलू नये किंवा वाचातीत अशी अवस्था ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने प्रगट करतात. ते म्हणतात-

 न बोलसी करा वाचा।उपाधीचा संबंध।।काहीही बोलले तरी या शब्दातून उपाधी निर्माण होते व जिथे जिथे उपाधी तिथे तिथे दु:ख हे ठरलेलेच असते म्हणून अनिर्वचनीय भूमिकेचे समर्थन तुकाराम महाराज करीत असतात. ते म्हणतात की, जर बोलायचेच असेल तर फक्त देवाविषयी बोलावं बाकी काही नको.

बोलणेचि नाही। आता देवाविण काही।।आता या वाचेने प्रपंचातील काही बोलणे नाही, जे बोलायचे ते फक्त देवाविषयी, अशी ही वाचा भगवद्स्वरूप झालेली आहे. या वाचेला भगवंत नामाचा छंद लागलेला आहे.

माझी मज झाली अनावर वाचा।छंद या नामाचा घेतलासे।।देवर्षी नारदमुनींनी हीच भूमिका भक्तिसूत्रामध्ये सांगितली आहे.अव्यावृत भजनात। ही अवस्था येण्यासाठी प्रथमत: वाचेच्या ठिकाणी या प्रापंचिक आसक्तीने निर्माण झालेले दोष जावे लागतील. कारण प्रपंचामध्ये असताना ही वाचा नको नको ते शब्द बोलून अत्यंत मलिन झालेली आहे. या वाचेतून निघणाºया शब्दाने अनेक कलह समाजामध्ये निार्मण झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी माणसाने ‘कसे बोलू नये’ याचे वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरीतील १३ व्या अध्यायात

विरोधू वादुबळु। प्राणितापढाळु।उपहासु छळु। वर्मस्पर्शुआटु वेगु विंदाणु। अशा शंका प्रतारणु।हे संन्यासिले अवगुणु। जिया वाचा।।आपल्या या वाचेने उपहासाने बोलू नये, छळाचे बोलू नये. हट्टाचे बोलू नये, कपटाचे बोलू नये, वर्मस्पर्शी बोलू नये, शंका निर्माण करणारे बोलू नये, फसवणूक करणारे बोलू नये. अशाप्रकारचे कोणतेही शब्द आपल्या तोंडातून येऊ नयेत. कारण हे बोलणे समाजामध्ये कलह निर्माण करतात; मग या वाचेने कसे बोलावे याचेही उत्तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात-

तैसे साच आणि मवाळ। मितले परि सरळ।।बोल जैसे कल्लोळ। अमृताचे।।माणसाने खरे बोलावे, मवाळ बोलावे, मोजके पंरतु सरळ असे बोलावे. त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटा आहेत, असे वाटावे. या बोलण्याने समाजात शांतता, समाधान निर्माण होत असते.- अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर