शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोन्याच्या शुद्धतेबाबत तडजोड नकोच-

By admin | Updated: December 11, 2014 00:01 IST

मुरलीधर चिपडे यांचा ग्राहकांना सल्ला---थेट संवाद

हौसेला मोल नसते असे म्हणतात. त्यात ती हौस सोन्या-चांदीच्या अलंकारांची असेल, तर ती अधिक जिव्हाळ्याची आणि मौल्यवान. आता सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जात असल्याने दर कमी-जास्त झाले तरी खरेदीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. मात्र, काहीवेळा ग्राहकांची फसवणूकही होऊ शकते. हे टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, या विषयावर मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ पेढीचे मुरलीधर चिपडे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार कशावर ठरतो?उत्तर : सोन्या-चांदीचे दर वाढले की, सराफ व्यावसायिकांचे नाव पुढे केले जाते. मात्र, हे दर सराफ व्यावसायिक ठरवूच शकत नाहीत. सोने-चांदीचे दर डॉलरशी आणि क्रूड आॅईलशी संबंधित असतात. अमेरिकेत डॉलरची किंंमत वाढली की, सोन्या-चांदीसह अन्य वस्तूंच्या किमती कमी होतात. यापुढेही डॉलर अधिक बळकट होणार असल्याने सोन्याच्या दरात फार वाढ होणार नाही. सोन्याचे दर सव्वीस ते सत्तावीस हजारांवर स्थिर राहतील, असा अंदाज आहे. सण-समारंभानिमित्त दागिन्यांची खरेदी केली जातेच. गेल्या काही महिन्यांत सोन्याचे दर कमी झाल्याने नक्कीच ग्राहकांत आनंदाचे वातावरण आहे. अलंकार खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. प्रश्न : फसवणूक टाळण्यासाठी अलंकार खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?उत्तर : हॉलमार्क प्रमाणित दागिने खरेदी केले की, नव्याण्णव टक्के फसवणूक येथेच थांबते; कारण दागिन्यांची शुद्धता ९५ टक्के असल्याशिवाय हॉलमार्क दिले जात नाहीत. कॅरेटनुसार दागिन्याचा दर लावला जातो का, हेदेखील पाहणे महत्त्वाचे असते. प्रत्येक सराफ पेढीवरील मजुरीच्या दरात पाच-दहा रुपयांनी फरक असू शकतो; मात्र मजुरी आणि मूळ दागिना यांची किंमत अन्य सराफ पेढ्यांच्या तुलनेत खूपच जास्त असेल, तर मात्र ग्राहकांनी चौकशी करूनच खरेदी केलेली चांगली. नाहीतर आपल्याच खिशाला भुर्दंड बसतो.प्रश्न : ग्राहकांतून कोणत्या प्रकारच्या अलंकारांना अधिक पसंती दिली जाते ?उत्तर : अत्याधुनिक प्रकारचे कितीही अलंकार बाजारपेठेत आले तरी पारंपरिक दागिन्यांची क्रेझ कधीच कमी होत नाही. कोल्हापूरकरांची पहिली पसंती पारंपरिक अलंकारांनाच आहे. यात टेंपल ज्वेलरी, मोहनमाळ, वाकी, कंगन, नेकलेस, पाटल्या-बिलवर अशा अलंकारांना अधिक मागणी आहे. पारंपरिक दागिन्यांचा आधुनिक साज चढविलेले डिझायनर दागिने म्हणजे जुन्या-नव्याचा मिलाफ असल्याने लग्नसमारंभासाठी या दागिन्यांचीच अधिक खरेदी केली जाते. आमच्या पेढीवर अशी डिझाईन बनविले जातात; त्यामुळे ती अन्यत्र उपलब्ध होत नाहीत. प्रश्न : चिपडे सराफ पेढीची वैशिष्ट्ये कोणती?उत्तर : मूळच्या कोल्हापूरच्याच असलेल्या केशव मार्तंड चिपडे पेढीचे पंचवीस वर्षांपूर्वी मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ पेढीत रूपांतर झाले. मुरलीधर, बन्सिधर, गिरीधर आणि तुषार असे आम्ही चार भाऊ पेढी सांभाळतो. आता आमची पुढची पिढीही याच क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. १२४ वर्षांची परंपरा लाभलेल्या आमच्या पेढीवर सर्व अलंकार हॉलमार्क प्रमाणित असतात; त्यामुळे ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची हमी मिळते. डिझाईनमधील नावीन्य आणि सर्वसामान्यांनाही खरेदी करता येतील, अशा बजेटमध्ये हिऱ्यांचे दागिनेदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे हिऱ्यांची खरेदी ही आवाक्याबाहेरची गोष्ट राहिलेली नाही. याशिवाय चांदीचे अलंकार, पूजेचे साहित्य यांचे स्वतंत्र दालन आहे. याशिवाय एक ग्रॅम फोर्र्मिंंग दागिन्यांमध्ये जयपूर, उदयपूर, हैदराबादी, कोलकाता, कोल्हापुरी, ब्रायडल, असे सुंदर दागिने उपलब्ध आहेत. आता भाऊसिंगजी रोडवरील दालन अपुरे पडत असल्याने नागाळा पार्क येथे अद्ययावत शोरुम उभारण्यात येत आहे. शब्दांकन : इंदुमती गणेश