शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्या नव्हे; अहल्या! नामकरणानंतर नवा वाद, ‘पुण्यश्लोकी’च हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 05:03 IST

सोलापूर विद्यापीठाचे समारंभपूर्वक ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असे नामकरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नावाच्या व्याकरणावर व अर्थावर नवीनच वाद सुरू झाला आहे.

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचे समारंभपूर्वक ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असे नामकरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नावाच्या व्याकरणावर व अर्थावर नवीनच वाद सुरू झाला आहे. भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी ‘अहिल्या’ शब्दाला आक्षेप घेत ‘अहल्या’ असा उल्लेख करायला हवा, असे स्पष्ट केले आहे.‘लोकमत’ शी बोलताना उत्पाद म्हणाले की, अहल्यादेवी होळकर या कर्तबगार स्त्री होत्या. त्यांचे नाव विद्यापीठाला देण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो; पण हा नामविस्तार करताना विद्यापीठाच्या भाषातज्ज्ञांनी अर्थ तपासून पाहायला हवा होता.अहल्यादेवी होळकर यांचे कागदोपत्री नावही ‘अहल्या’ असेच आहे. श्रीमंत माधवराव पेशवेही त्यांना पाठविलेल्या पत्रांमध्ये ‘अहल्याबाई मातोश्री यांच्या सेवेशी’ असा उल्लेख करत असत. शिवाय महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या लेखात आणि आपल्या एका पुस्तकातही अहल्या असाच नामोल्लेख केलेला आहे, असे उत्पात यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या नामविस्तारामध्ये पुण्यश्लोक असा करण्यात आलेला उल्लेखही व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचा आहे. पुण्यश्लोक हा पुल्लिंगी शब्द आहे. अहल्यादेवी यांच्या नावात पुण्यश्लोकी असा उल्लेख हवा होता, असेही ते म्हणाले.>अहल्या हा मूळ संस्कृत शब्द आहे. जुन्या अनेक ग्रंथामध्ये अहल्या हा शब्द आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुण्यातल्या आश्रमासही अहल्या आश्रम असे नाव दिले. मात्र अलीकडे अहल्या या नावाचा अपभ्रंश अहिल्या नावानं रुढ झाला. रुढ शब्द आहे त्यानुसारच अहिल्या शब्द वापरला गेला असावा.- प्रा. डॉ. दत्ता घोलप,मराठी विभाग, सोलापूर विद्यापीठ