शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

शहर उत्तरमध्ये ५.५८ तर दक्षिण मतदारसंघात ४.६१ टक्के मतदान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:17 IST

सोलापूर लोकसभा मतदान टक्का : पंढरपूरमध्ये २.१७ तर अक्कलकोटमध्ये १.९४ टक्के मतदानात वाढ

ठळक मुद्देसोलापूर शहर मध्य मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत ५५.४४ टक्के इतके मतदान झालेपंढरपूर मतदारसंघात २.१७, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात १.९४ तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातही १.५५ टक्के मतदान

राजकुमार सारोळे

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या मतदानात शहर उत्तर मतदारसंघात ५.५८ तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात ४.६१ टक्के मतदान मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढले आहे. पंढरपूर मतदारसंघात २.१७, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात १.९४ तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातही १.५५ टक्के मतदान वाढल्याने निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

२०१४ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघात ६२.५३ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ६४.०८ टक्के इतके मतदान झाले आहे. या मतदारसंघात १.५५ टक्के मतदान वाढले आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात मागील निवडणुकीत ५३.२१ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात तब्बल ५८.७९ टक्के मतदान झाले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत ५४.९२ टक्के मतदान झाले होेते. या निवडणुकीत या मतदारसंघात ५६.८६ टक्के मतदान झाले आहे.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत ५१.८८ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत या ठिकाणी तब्बल ५६.४९ टक्के इतके मतदान झाले आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत ५७.२७ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत या मतदारसंघात ५९.४४ टक्के इतके मतदान झाले आहे. 

मोहोळ विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत १ लाख ७५ हजार ४५० मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत येथील १ लाख ९३ हजार ९९० मतदारांनी मतदान केले आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात मागील निवडणुकीत १ लाख ४० हजार ९३० मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत येथे १ लाख ६३ हजार ९६३ मतदारांनी मतदान केले आहे. 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत १ लाख ७४ हजार २६६ मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत येथील तब्बल १ लाख ९४ हजार ४३३ मतदारांनी मतदान केले आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत १ लाख ४६ हजार ११ मतदारांनी मतदान केले होते. 

या निवडणुकीत येथील तब्बल १ लाख ७१ हजार ४५२ मतदारांनी मतदान केले आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत १ लाख ६४ हजार ७८४ मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत या मतदारसंघात १ लाख ९६ हजार ८९१ मतदारांनी मतदान केले.

शहर मध्य मात्र स्थिर- सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत ५५.४४ टक्के इतके मतदान झाले होते. या निवडणुकीत मागील निवडणुकीच्या तुलनेत ०.३६ टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. मतदानाची ही कमी झालेली अल्प परिस्थिती पाहता दोन्ही निवडणुकांत या मतदारसंघातील मतदार स्थिर असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानElectionनिवडणूक