शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आस्वाद न घेणाºयांना वाटते कडक भाकरी शिळी; ओलावा नष्ट करुन ‘ती’ वाळविल्यास राहते ताजीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:32 IST

रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : चुलीच्या तव्यावरील गरम भाकरी वाळवताना त्यातील तंतू (फायबर) म्हणजे ओलसरपणा पूर्णत: गेला तर तयार झालेली ...

ठळक मुद्देसोलापुरी कडक भाकरीची चव सातासमुद्रापार गेली आहेराज्यासह परप्रांतातील हॉटेल व्यवसायिक, घरगुती ग्राहक खास कडक भाकरी घ्यायला येतात

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : चुलीच्या तव्यावरील गरम भाकरी वाळवताना त्यातील तंतू (फायबर) म्हणजे ओलसरपणा पूर्णत: गेला तर तयार झालेली कडक भाकरी ही पाच महिन्यांपर्यंत ताजीच राहते. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरी कडक भाकरीचा आस्वाद ग्राहकांना मिळवून देणारे इतर जिल्ह्यातील, परप्रांतांतील हॉटेल्सवाल्यांनीही ‘सोलापुरी कडक भाकरी ताजीच’ असा दाखला दिला आहे.

रविवारी पंढरपुरात एस. टी. महामंडळाच्या यात्री निवास आणि विस्तारित बसस्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी राज्यभरातून आलेल्या वारकºयांना भोजनात कडक भाकºया ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी काही वारकºयांनी देण्यात आलेली कडक भाकरी शिळी असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यावर स्पष्टीकरण करताना आयोजक म्हणाले, कडक भाकरी अन् शेंगाची चटणी हा सोलापुरी खास मेनू असल्याचे सांगून त्यांचे समाधान केले होते.

कडक भाकरी शिळी की ताजी, यावर ‘लोकमत’ने सोलापुरातील कडक भाकरी बनविणाºया महिला व्यावसायिक आणि हॉटेलमध्ये कडक भाकरी ठेवणाºया हॉटेल व्यावसायिकांना बोलते केले असता त्यांनी कडक भाकरी पाच महिन्यांपर्यंत ताजीच असते, असा निर्वाळा दिला. आलेल्या मागणीनुसार मी जेव्हा-जेव्हा कडक भाकरी पोहोच करतो, तेव्हा-तेव्हा तेथील मागणी वाढतच असते. यावरुन सोलापुरी कडक भाकरी ताजी असल्याचाच अनुभव येत असल्याचे कडक भाकरी बनविणारे नीलकंठ स्वामी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

भाकरीतील ओलावा घालविल्याने ती ताजी- सुलोचना - हाताने बडवलेली भाकरी चुलीवरील अथवा गॅसवरील तव्यावर ठेवली जाते. गरम झालेली भाकरी आधी विस्तवासमोर आडवी केली जाते. नंतर ती मोकळ्या हवेत अथवा पंख्याखाली वाळवली जाते. त्यातील पूर्णत: तंतू नष्ट झाल्यावरच ती अगदी कडक बनते. प्रत्येक भाकरी न् भाकरीतील ओलावा नष्ट केल्यावरच ती अशी कडक बनते, ती किमान ५ महिन्यांपर्यंत ताजीच राहते, असे सोलापुरातील मजरेवाडी येथील ७५ वर्षीय सुलोचना स्वामी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. गेल्या १०-१२ वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, बंगळुरु, हैदराबाद येथील हॉटेल व्यावसायिक सातत्याने भाकरीची आॅर्डर देत असताना कधीच शिळी असल्याची तक्रार आजपर्यंत केली नसल्याचेही सुलोचना स्वामी यांनी सांगितले. 

ज्यांना माहीत नाही, त्यांना शिळीच वाटणार- सुरेखा स्वामी- सोलापुरी कडक भाकरीची चव सातासमुद्रापार गेली आहे. आज आमच्याकडे जिल्ह्याच नव्हे तर राज्यासह परप्रांतातील हॉटेल व्यवसायिक, घरगुती ग्राहक खास कडक भाकरी घ्यायला येतात. आजपर्यंत त्यांना या भाकरी कधीच शिळ्या वाटल्या नाहीत. सोलापुरी कडक भाकरीची ज्यांनी कधीच आस्वाद घेतला नाही, त्यांना ही भाकरी दिल्यावर शिळीच वाटणार, असे मत सुरेखा नीलकंठ स्वामी यांनी व्यक्त केले. वीरभद्रेश्वर कडक भाकरी सेंटरमधून दररोज दीड-दोन हजार भाकरी राज्यात इतरत्र जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

मी १५-२० वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहे. सोलापुरात कडक भाकरी बनविणाºया अनेक महिला आहेत. हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक कडक भाकरीच मागतो. मागणीनुसार कडक भाकºया आल्या तर आमच्याकडे त्या एक-दीड महिने असतात. तरीही त्या ताज्याच असतात. जाताना ग्राहक हमखास ‘क्या कडक भाकरी थी. मजा आया’, असे दाखला देतात.-शेखर बिद्री (सावजी हॉटेल)

कडक भाकरी हे सोलापूरचे ब्रँडिंग झाले आहे. आमच्या हॉटेलमध्ये कुटुंबासमावेत येणारे ग्राहक ‘सोलापुरी कडक भाकरी आहे ना’ अशी विचारणा करुन त्या भाकरीचा आस्वाद घेतात. सोलापुरी कडक भाकरी ही पाच महिने ताजी असते, असा माझा अनुभव आहे.-गौरीशंकर नागठाण,हॉटेल व्यावसायिक, मोहोळ.

टॅग्स :Solapurसोलापूर