शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट तालुक्यातील अवैध वाळू रोखण्यासाठी नऊ पथके, कारवाईसाठी प्रशासन झाले जागे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 11:03 IST

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील सीना-भीमा नदीपात्रातून अवैधपणे बेसुमार वाळू तस्करी होत असल्याचे प्रकार ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे उघडकीस आणले.

ठळक मुद्देसीना-भीमा नदीपात्रातून अवैधपणे बेसुमार वाळू तस्करी३१ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वच ठिकाणच्या वाळू उपसा परवान्याची मुदत संपलीचोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक सुरू तडवळ भागातील रस्ते वाळू वाहतुकीमुळे धोकादायक

आॅनलाइन लोकमत सोलापूरअक्कलकोट दि २४: अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील सीना-भीमा नदीपात्रातून अवैधपणे बेसुमार वाळू तस्करी होत असल्याचे प्रकार ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे उघडकीस आणले. याची दखल घेत तहसीलदार दीपक वजाळे यांनी नऊ महसूल मंडलांमध्ये प्रत्येकी एक असे नऊ पथक तयार करुन रात्रंदिवस कारवाईसाठी झटत आहेत.३१ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वच ठिकाणच्या वाळू उपसा परवान्याची मुदत संपली आहे. त्यानंतर नियमानुसार वाळू उपसा बंद करण्याऐवजी चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात ‘लोकमत’ने तडवळ भागातील रस्ते वाळू वाहतुकीमुळे धोकादायक बनले आहेत. तडवळ भागात शंभरहून अधिक अवैध वाळू साठे आहेत. वाळू तस्करांनी वाहतुकीचा नवा मार्ग शोधला आहे. अशा पद्धतीने तीन दिवसांची मालिका प्रसिद्ध केली होती. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन खडबडून जागे होऊन तहसीलदार वजाळे यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे.तहसीलदार वजाळे यांनी या पार्श्वभूमीवर तातडीने अक्कलकोट, चपळगाव, वागदरी, मैंदर्गी, दुधनी, करजगी, नागणसूर, तडवळ, किणी या नऊ महसूल मंडळातील सर्व मंडलाधिकारी, संबंधित गाव कामगार तलाठी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सापडलेल्या त्या वाळू वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. अशाप्रकारे पथक कार्यरत करुन लेखी आदेश देण्यात आले आहेत. मागील पाच दिवसापांसून हे पथक चोरटी वाळू वाहतूक मार्गावर दबा धरुन बसले आहे. ------------------------यांचा आहे पथकात समावेशशेगाव, धारसंग, देवीकवठे, कुडल, खानापूर, अंकलगे, म्हैसलगे, आळगे, गुड्डेवाडी, सुलरजवळगे, पानमंगरुळसह विविध ठिकाणी फिरते पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. हे पथक सोमवार ते शुक्रवार या कालावधीत रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत कारवाईसाठी सतर्क आहे. यामध्ये चपळगावचे मंडल अधिकारी एम. एल. स्वामी, जेऊर-जमादार, अक्कलकोट-एम. के. घोसले, तडवळ-पारसे, मैंदर्गी-बेलभंडारे यांच्यासह गाव कामगार तलाठी व कोतवालांचा समावेश आहे.-------------------अवैध वाळू उपसा विरोधात मोहीम चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंडलामध्ये मंडल अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली तलाठी व कोतवाल यांचे संयुक्त पथक तयार करून कारवाईसाठी कार्यरत ठेवले आहे. प्रत्येक मंडलात हे पथक आहे. खबºयामार्फत वाळू तस्करांना माहिती मिळत असली तरी लवकरच मोठ्या शिताफीने कारवाई करु व पूर्णपणे अवैध वाळू उपसा बंद करु.-दीपक वजाळे, तहसीलदार, अक्कलकोट

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस