शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रात्रीत झाले बार्शी डिजिटलमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:19 IST

नगरपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त मोहीम, आता डिजिटलला परवानगी नाही

ठळक मुद्देडिजिटल बोर्ड लावल्यास त्याच्यावर कारवाई - पोलीसबार्शी शहर डिजिटलमुक्त करण्याचे माझे मिशन - विश्वासराव साळोखे

शहाजी फुरडे-पाटील बार्शी : मुळातच अरुंद असलेल्या बार्शी शहरात गेल्या काही वर्षांपासून डिजिटल फलकांचे पेव फुटले होते. त्यामुळे शहरातील विविध चौकात वेडेवाकडे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे, विद्रुपीकरण करणारे डिजिटल फलक मोठ्या दिमाखात झळकत होते़ यावर कोणाचाच पायबंद नव्हता; मात्र गेल्या आठवड्यात बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वासराव साळोखे यांनी शहरातील वाहतूक व डिजिटलचा विषय हाती घेत उपाययोजना सुरु केल्या आहेत़ याचाच एक भाग म्हणून गुरूवारी रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत डिजिटल हटाव मोहीम राबवून एका रात्रीत शहरातील शंभरापेक्षा जास्त डिजिटल काढून टाकले. 

बार्शी शहरात सर्वच राजकीय पक्ष, शिक्षण संस्था, क्लासेस, महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी, विविध व्यावसायिक, युवानेते, भावी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे, जाहिरातींचे भव्य डिजिटल शहरातील विविध चौकाचौकात लावले होते. प्राधान्याने हे डिजिटल बसस्थानक चौक, जुना गांधी पुतळा, यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह, हांडे गल्ली चौक, शंकेश्वर उद्यान चौक, बाळेश्वर नाका, नगरपालिकेसमोर, लहुजी वस्ताद चौक, कॅन्सर हॉस्पिटल चौक, हिरेमठ हॉस्पिटल चौक, भोसले चौक, शिवाजी कॉलेज परिसर, हायवे स्टॉप, गांधीनगर स्टॉप या शहरातील प्रमुख भागासह संपूर्ण शहरात मोठमोठे डिजिटल फलक लावून शहराचे विद्रुपीकरण झाले होते़ नगरपालिकेनेदेखील डिजिटलमुक्त बार्शी करण्याचा ठरावही केला होता़ मात्र त्याची अंमलबजावणी काही होत नव्हती़ 

नव्याने पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले विश्वासराव साळोखे यांनी वाहतूक व्यवस्था व डिजिटलमुक्त बार्शी हा मुख्य अजेंडा हाती घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे व विनापरवाना लावलेले डिजिटल काढण्याची मोहीम बुधवारी रात्री अचानक सुरू केली.

या मोहिमेत बसस्थानक चौक, तुळजापूर रोड, पोस्ट चौक, बाळेश्वर नाका, कुर्डूवाडी  नाका, शिवाजी कॉलेज चौक, अलीपूर रोड, उपळाई रोड, परंडा  नाका, शासकीय आयटीआय, एकविराई चौक, तानाजी चौक,  हांडे गल्ली चौक, कचेरी रोड, भीमनगर रोड, फुलवार चौक, आझाद चौक, भोसले चौक, हिरेमठ हॉस्पिटल या सर्व भागातील डिजिटल काढून टाकले. केवळ डिजिटलच न काढता त्यासाठी तयार केलेले बांबूचे सांगाडेदेखील काढून टाकण्यात आले़

कोणत्याच डिजिटलला परवानगी नाही- स्वच्छ भारत अभियानांतर्गत बार्शी शहर डिजिटलमुक्त करण्याचे माझे मिशन असून, शहराचे विद्रुपीकरण करणारे, वाहतुकीला अडथळा आणणारे डिजिटल काढून टाकण्यात आले आहेत़ यापुढील काळात शहरात कोणत्याच प्रकारचे डिजिटल फलक लावण्यास आमच्याकडून परवानगी देण्यात येणार नाही़ याबाबत आम्ही नगरपालिकेलादेखील तसे कळविणार आहोत़ त्यामुळे यापुढील काळात कोणीच कसल्याही प्रकारचे डिजिटल बोर्ड लावल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल़ त्यामुळे आपले शहर सुंदर दिसावे तसेच कायदा व सुव्यवस्था उत्तम राहावी, यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे़, असे आवाहन पोलीस निरीक्षक विश्वासराव साळोखे यांनी केले आहे.

यांनी केली कारवाई - ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वासराव साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शमीम शेख, पोलीस उपनिरीक्षक अन्वर मुजावर यांच्यासह नगरपालिकेचे मिळकत व्यवस्थापक महादेव बोकेफोडे, लिपिक संतोष कांबळे, बापू बनसोडे, मच्छिंद्र राऊत व पोलीस स्टेशनचे ५० कर्मचारी व नगरपालिकेच्या १० कर्मचाºयांनी केले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस