आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : पायोनिअर ट्रेकिंग ग्रुप ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून सोलापूर, अकलूजसह राज्यातील १५ नवख्या ट्रेकर्सनी हिमालयीन शिखरावर १५ हजार फुटांची यशस्वी चढाई केली. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आणि सहकाºयांनी या चौदा ते पन्नास वयोगटाच्या नवीन गिर्यारोहकांना मार्गदर्शन केले. सोलापूरच्या अर्चना तावनिया व पूर्वा तावनिया या माय-लेकींचाही या मोहिमेत सहभाग होता. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे काम करत असलेल्या युनायटेड नेशन्सच्या हीफॉरशी या स्त्री-पुरुष समानतेसाठी ही मोहीम समर्पित होती शिवाय अंबेजोगाईच्या विजय चाटे या युवकाने ‘आॅर्गन डोनेशन’ जागृतीसाठी या मोहिमेद्वारे काम सुरु केले असून, १५००० फुटांवरून त्याने याबाबतचा संदेशही दिला आहे.या मोहिमेचा प्रारंभ २० डिसेंबर रोजी झाला. २३ डिसेंबरला मनाली येथून सुरुवात करून १०००० व १२००० फुटांवर दोन कॅम्प सेट करून या टीमने पुढील चढाई केली. गुडघ्याइतक्या बर्फातून मार्ग काढत या टीमने पुढील चढाई पूर्ण केली. या टीमकडे कोणताही अनुभव नसताना इतकी उंची गाठणे या टीमसाठी मोठी गोष्ट होती. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, बालाजी जाधव, करण पंजाबी, निहाल बागवान या सर्वांच्या प्रेरणेमुळे व मार्गदर्शनामुळे या सर्वांनी हे करून दाखवले. पुणे येथील उद्योजिका सुषमा कोलवणकर, मयुरी लाटे, किशोर दाते, माधवी मिनासे यांच्यासोबत सांगली येथील गायत्री ओझा यांनीही हा ट्रेक पूर्ण केला. अकलूज येथील प्राथमिक शिक्षक असलेले कृष्णदेव माने या शिक्षकानेही सरधोपट मार्ग सोडून वेगवेगळे अनुभव घेतले. वालचंद अभियांत्रिकी कॉलेजमधील साक्षी सिंघलने १५००० फुटांवर चढाई करून ‘शिक्षणासोबत इतर साहसी कामगिरी केली पाहिजे’ असा संदेश दिला. या मोहिमेनंतर दिल्ली विधानसभेत या टीमचे कौतुक झाले व दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामविलास गोयल यांनी या टीमचे अभिनंदन केले. ---------------------अर्चना तावनियांचे धाडस- अर्चना तावनिया यांनी पहिल्यांदा गिर्यारोहण करताना पंधरा हजार फुटांची हिमालयावरील उंची गाठण्याचे धाडस केले. विशेष म्हणजे त्या अनेक वर्षांनंतर घराबाहेर पडल्या होत्या. मुलींसोबत ट्रेकिंग करताना आनंद वाटला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. माधवी मिनासे यांनीही एक्स्प्लोररच्या नियोजनाचे कौतुक केले. या मोहिमेमुळे आत्मविश्वास वाढल्याचे त्या म्हणाल्या.
नवख्या ट्रेकर्सची हिमालयावर १५००० फूट चढाई, दिल्ली विधानसभेत कौतुक, सोलापूरच्या माय-लेकीचे गिर्यारोहण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 16:27 IST
पायोनिअर ट्रेकिंग ग्रुप ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून सोलापूर, अकलूजसह राज्यातील १५ नवख्या ट्रेकर्सनी हिमालयीन शिखरावर १५ हजार फुटांची यशस्वी चढाई केली.
नवख्या ट्रेकर्सची हिमालयावर १५००० फूट चढाई, दिल्ली विधानसभेत कौतुक, सोलापूरच्या माय-लेकीचे गिर्यारोहण !
ठळक मुद्देपायोनिअर ट्रेकिंग ग्रुप ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून सोलापूर, अकलूजसह राज्यातील १५ नवख्या ट्रेकर्सनी हिमालयीन शिखरावर १५ हजार फुटांची यशस्वी चढाईगुडघ्याइतक्या बर्फातून मार्ग काढत या टीमने पुढील चढाई पूर्ण केलीअर्चना तावनिया यांनी पहिल्यांदा गिर्यारोहण करताना पंधरा हजार फुटांची हिमालयावरील उंची गाठण्याचे धाडस केले