शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नवलच; घागर, हंडा, कळशी अन् डबा वाजवित झाला ढोलकीवादक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 14:52 IST

निळू फुलेंच्या शाबासकीने मिळाली प्रेरणा; माढ्यातील तरुणाची अशीही कहाणी

ठळक मुद्दे- महाराष्ट्रात ढोलकीवादनाची कला जपणारे अनेक कलाकार - कलाकारांना व्यासपीठ न मिळाल्याने पारंपरिक वाद्ये लोप पावत आहेत- कलाकार जगला तर कला टिकणार आहे

माढा : घरात सहज बसल्या-बसल्या घागर, हंडा, कळशी अन् जेवणाचा डबा वाजविण्याची सवय होती़ मात्र तीच सवय पुढे कला बनली अन् एक ढोलकीवादक म्हणून नावलौकिक मिळाला़ विशेषत: अभिनेता निळू फुले यांच्या शाबासकीने तर प्रेरणाच मिळाली़ ही कहाणी आहे माढ्यातील तरुण कलाकार नीलेश देवकुळे यांची.

आई माढा नगरपंचायतीमध्ये सफाई कामगार तर वडील होमगार्ड म्हणून काम करतात़ परिस्थिती तशी हलाखीचीच त्यामुळे जीवनात कोणत्याही संगीताचा क्लास लावला नाही, ना कुणी संगीताचे धडे दिले.

काहीही शिकायचं म्हटलं तर त्यांना गुरु हा असावाच लागतो़ पण संगीतातील गुरु नीलेशला मिळालाच नाही़ लहानपणापासून नीलेशला ढोलकी वाजवण्याची आवड होती, पण त्याच्याकडे ती नव्हती. त्यामुळे तो घरातील घागर, हंडा, कळशी, जेवणाचा डब्बा यावर थाप मारून ढोलकी वाजविण्याची कला आत्मसात केली़ त्यानंतर या उपजत कलेच्या माध्यमातून ढोलकी वाजवू लागलो, असे ते सांगत होते़महाराष्ट्रात ढोलकीवादनाची कला जपणारे अनेक कलाकार आहेत. त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे़ या कलाकारांना व्यासपीठ न मिळाल्याने पारंपरिक वाद्ये लोप पावत आहेत़ कलाकार जगला तर कला टिकणार आहे, असे ढोलकीवादक नीलेश देवकुळे म्हणाले.

असा झाला सन्माननीलेश देवकुळे यांनी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर झालेल्या ‘ढोलकी झाली बोलकी’ या कार्यक्रमात त्यांनी ढोलकी वादन केले़ त्यात तो विजेता ठरला़ तसेच महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला़ टेंभुर्णी फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव, पिंपरी चिंचवडमध्ये बालकलाकार यांसह अन्य पुरस्कार मिळालेले आहेत़ नीलेश परिवारात मामा, आई, आजी यांना ढोलकीची आवड होती़ तोच वारसा त्यांनी आजपर्यंत जपला असल्याचे दिसून येते़ 

 

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-acमाढाmusicसंगीत