शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील नवीन चिप्पा मंडईचे कट्टे पडले ओस, विक्रेत्यांना अद्याप ‘सत्तर फूट’चाच सोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 12:11 IST

यशवंत सादूल ।  सोलापूर : मागील २५-३० वर्षांपासून भाजी बाजाराच्या अतिक्रमणामुळे गुदमरलेल्या ७० फूट रोडने गुरूवारी मोकळा श्वास घेतला. ...

ठळक मुद्देमहानगरपालिकेच्या वतीने चिप्पा मार्केटमध्ये मागील २० वर्षांपासून भाजी मार्केट बांधून तयारफूटपाथवरील बाजाराची सवय जडल्याने विक्रेते तिकडे जायला तयार नाहीत. ७० फूटचा प्रशस्त मार्गही या बाजारामुळे अपुरा पडायला लागला

यशवंत सादूल । 

सोलापूर : मागील २५-३० वर्षांपासून भाजी बाजाराच्या अतिक्रमणामुळे गुदमरलेल्या ७० फूट रोडने गुरूवारी मोकळा श्वास घेतला. महानगरपालिका आणि पोलिसांच्या सहकार्याने सकाळी झालेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईमध्ये येथील फूटपाथवरील बाजार हटविण्यात आला. तेथील विक्रेत्यांना चिप्पा मार्केट (अशोक चौक) येथील कट्टे देण्यात आले आहेत. मात्र काहीतर बदल होईल आणि पुन्हा जुन्याच ठिकाणी भाजी बाजार भरेल, या प्रतीक्षेत गुरू वारी दुपारी येथील विक्रेते बसलेले दिसून आले.

महानगरपालिकेच्या वतीने चिप्पा मार्केटमध्ये मागील २० वर्षांपासून भाजी मार्केट बांधून तयार आहे. मात्र फूटपाथवरील बाजाराची सवय जडल्याने विक्रेते तिकडे जायला तयार नाहीत. ग्राहकांकडूनही या रस्त्यावरच्या भाजी बाजाराला प्रतिसाद मिळत असल्याने मागील १५ वर्षात येथील बाजार वाढत गेला. मात्र ७० फूटचा प्रशस्त मार्गही या बाजारामुळे अपुरा पडायला लागला. ग्राहकांची भर रस्त्यावर उभी राहणारी वाहने, अगदी रस्त्यावर लागणारी दुकाने, हातगाड्या यामुळे स्थानिक नागरिकांची डोकेदुखी मात्र वाढलेली होती. एकीकडे सोलापूर स्मार्ट करायला निघालेल्या प्रशासनालाही हा रस्त्यावर भरणारा बाजार हटवून नियोजित स्थळी म्हणजे चिप्पा मार्केटमध्ये स्थलांतरित करणे आवश्यक होते. त्यामुळे बुधवारी महानगरपालिकेने एक कार्यक्रम आयोजित करून या मार्केटमध्ये विक्रेत्यांना पाचारण केले. सर्व विक्रेत्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून ओट्यांचे वाटप केले. 

दरम्यान, गुरूवारी विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणेच ७० फूट रोडवर येऊन दुकाने थाटली. मात्र अतिक्रमण हटावो मोहिमेतील पथकाने या सर्व भाजी विक्रेत्यांशी संवाद साधत रस्त्यावरील विक्री बंद करून मंडईत जाण्यास विनंती केली. त्यानंतर भाजीविक्री बंद करण्याच्या सूचना केल्या. 

दुपारी या परिसराला भेट दिली असता ७० फूट रोडवर फूटपाथवर विक्रेते निवांत बसलेले दिसून आले. महानगरपालिका प्रशासन विक्रेत्यांच्या बाजूने विचार करून काहीतरी सकारात्मक निर्णय होेईल, अशी आशा अनेकांनी व्यक्त केली. ७० फूट रोड भाजी मार्केटचे अध्यक्ष दौला बागवान म्हणाले, महानगरपालिकेने बाजार बंद पाडल्याने २०० विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे. मागील ३० वर्षांपासून या ठिकाणी विक्री सुरू होती. या सर्वांना जागा मिळालेली नाही. त्यामुळे अनेकांच्या उपजीविकेचे साधन हिरावणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दत्ता भाले, गणपत वाघमारे, जैबुन शेख, गणेश वाघमारे, ताराबाई कोळे, स्मिता मांडवी आदींसह अनेक विक्रेते फूटपाथवर बसलेले दिसून आले.

पिशवी हलवीत गेल्या..- अशोक चौक येथील नियोजित मंडईमध्ये भाजी बाजार सुरू होणार, असे कळल्याने रंजना रमेश घनाते या आजीबाई पिशवी घेऊन आल्या. मात्र मंडईत एक ही भाजी विक्रेता नसल्याचे पाहून रिकामी पिशवी हलवित परत निघाल्या. ७० फूट रोडवरील गर्दीत भाजी खरेदी करण्यापेक्षा या ठिकाणी सुरक्षितपणे खरेदी करता येईल, अशी प्रतिक्रिया द्यायला मात्र त्या विसरल्या नाही.- शंकर वडनाल म्हणाले, चिप्पा भाजी मंडई सर्वांच्या सोयीची असल्याने व रहदारीस कोणताही अडथळा येथे नसल्याने येथेच भाजी मंडई भरवली जावी. सवय होईपर्यंत विक्रेते आणि ग्राहक दोघांनाही त्रास होईल, मात्र या ठिकाणासारखी सुरक्षितता रस्त्यावर नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार