शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात महावितरणच्या नवीन मंडल कार्यालयास मंजुरी

By admin | Updated: March 25, 2017 17:30 IST

पंढरपुरात महावितरणच्या नवीन मंडल कार्यालयास मंजुरी

पंढरपुरात महावितरणच्या नवीन मंडल कार्यालयास मंजुरीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यापुर्वी महावितरण विभागाचे एक मंडल कार्यालय होते. त्यामुळे सर्व वीज ग्राहकांचा भार एकाच मंडल कार्यालयावर येत होता. नवीन मंडल कार्यालय व्हावे अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यानुसार पंढरपूर येथे नवीन मंडल कार्यालयास मंजुरी देण्यात आली आहे़ तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप व अक्कलकोट येथे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आल्याची माहिती सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़शुक्रवारी मंत्रालयात ऊजामंत्र्याच्या दालनात सोलापूर जिल्ह्यातील वीज प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, कार्यकारी संचालक (मांस) सचिन ढोले, सोलापूर जिल्हा ऊर्जा समन्वयक मोहन आलाट यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सोलापूर जिलह्यातील विजेच्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. शुक्रवारी झालेल्या बैठकीत ऊर्जा सचिव संजीवकुमार यांच्यासोबत ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यांनी पंढरपूर येथील मंडल कार्यालयाच्या निर्मितीची सूचना मान्य करून कार्यवाही करण्यास संमती दिली. यामुळे पंढरपूर येथील मंडल कार्यालयास तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातही अशीच स्थिती असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या कार्यालयावर व यंत्रणेवर ताण पडत असल्याने तेथेही उपविभागीय कार्यालयाची आवश्यकता होती. यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अथक प्रयत्नाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप आणि अक्कलकोट येथे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली. --------------------------------------------------पंढरीतील पोल फॅक्टरी होणार कार्यान्वितपंढरपूर येथील महावितरण कंपनीच्या मालकीची पोल फॅक्टरी सध्या बंदावस्थेत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर पोल उपलब्ध करणे आणि पुरवठा करणे अडचणीचे ठरत आहे. यामुळे बंद असलेली फॅक्टरी पुन्हा सुरू करण्याबाबात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांना सुचविले. त्यांनी तत्काळ याला सहमती दर्शवित हा कारखाना तत्काळ सुरू करण्याचे आदेश याच बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबरच पंढरपूर येथे नवीन स्थापत्य विभाग व चाचणी विभागाची निर्मिती करण्यासही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नामुळे मान्यता देण्यात आली आहे.