शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरासमीप आली वैष्णवांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 06:06 IST

वारकऱ्यांचा धावा; दोन संतबंधूंची भेट, सर्व दिंड्या पंढरपूरच्या दिशेने

- शहाजी फुरडे-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : ‘तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा’ अशी हाक देत तोंडले-बोंडलेच्या उतारावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीमय वातावणात धावा पूर्ण केला आणि संत सोपानकाका, संत ज्ञानेश्वर माऊली या बंधूद्वयांच्या संगतीने रात्री पिराची कुरोली गाठली. उद्या बुधवारी बाजीरावची विहीर येथे दोन्ही पालख्यांची चार रिंगणे होणार आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बोरगावचा मुक्काम आटोपून तोंडले-बोंडलेच्या दिशेने निघाला़ तोंडले-बोंडले गावाच्या अलीकडे उतारावर एकदा पंढरीच्या दिशेने नजर टाकली आणि ‘तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा’ म्हणत वारकरी पंढरीच्या दिशेने धावण्यास सुरूवात केली. भक्तीमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यात सर्व दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वेगाने पळू लागले़ या दरम्यात संत श्रेष्ठ सोपानकाका महाराजांची पालखी बोंडले येथे दाखल झाली़ यावेळी संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज यांच्या भेटीचा सोहळा पार पडला़निवृत्तीनाथांनी ओलांडला लाखाचा टप्पासंतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीत सहभागी वारकºयांच्या संख्येने यंदा प्रथमच एक लाखाचा टप्पा ओलांडत सव्वा लाखाहून अधिक वारकºयांपर्यंत मजल मारली आहे, अशी माहिती पालखी समन्वय पुंडलिक थेटे यांनी दिली. पालखीने मंगळवारी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करुन करकंब येथे मुक्काम केला. आता अवघे दोन मुक्काम उरले आहेत. संत एकनाथ, संत मुक्ताबाई या पालख्यानीही पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे.रिंगणावर सावट : पंढरपूर समीप आल्याने आनंदित झालेले वारकरी हे रिंगण खेळ खेळून आपला आनंद द्विगुणित करतात. वाखरी शिवारातील बाजीराव विहीर येथे दोन्ही पालख्यांची मिळून चार ंिरंगणे होतात. उभी रिंगणे रस्त्यावर होतात. पण गोल रिंगणे शेतात होतात. मात्र शेतात चिखल असल्याने रिंगणाबद्दल वारकºयामधून चिंता व्यक्त केली जात आहे.दोन बंधूंची भेटउघडेवाडीच्या (ता. माळशिरस) शेतात ठाकुरबुवाच्या समाधीजवळ गोल रिंगणाचा अन् उडीचा खेळ खेळून चैतन्याने फुललेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने तोंडले येथे नंदाच्या ओढ्याकाठी विश्रांती घेऊन पंढरपूरची वाट धरली.पंढरपूर तालुक्याच्या हद्दीवर टप्पा येथे धाकटे बंधू सोपानदेवांची भेट घेऊन पालखी रात्री भंडीशेगावला (ता. पंढरपूर) मुक्कामी गेली.याच मार्गाने तुकाराम महाराज पालखीही जात असल्याने अनेक संतांच्या पादुकांचे दर्शन भाविकांना लाभले.