सोलापूर जिल्ह्यात मतदारांना पैसे वाटप करतांना राष्ट्रवादीचे १३ जण ताब्यातसोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेवून ६७ हजार १०० रुपयांची रोकड जप्त केली.पोलीस नाईक विनोद साठे यांनी दिलेल्या फियार्दीवरुन नानासो ज्ञानोबा कदम, सिताराम उत्तम कदम, संतोष मुरलीधर हजारे, बाबा महादेव हजारे, मच्छिद्र किसन हजारे, अशोक बापू कदम, शहाजी भगवान गोडसे, गजानन मधुकर कदम, सचिन शांताराम कदम, नवनाथ संदिपान थोरात, नानासो तुकाराम गोडसे, शिवाजी दादू धाडोरे, विठ्ठल दिगबंर कदम (सर्व.रा.शिगुर्णी.ता.माळशिरस ) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषद व पंचाय़त समितीच्या निवडणुकीसाठी २१ फेबु्रवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली़ सुरूवातीच्या काळात मतदान कमी गतीने झाले़ मात्र १० नंतर मात्र प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी पडत जात आहे़
सोलापूर जिल्ह्यात मतदारांना पैसे वाटप करतांना राष्ट्रवादीचे १३ जण ताब्यात
By admin | Updated: February 21, 2017 12:19 IST