शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नावाच्या घोळामुळे आमदाराचे नाव कर्जमाफी यादीत : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 19:39 IST

नावाच्या घोळामुळे कोल्हापूरतील शिवसेनेचे आ़ प्रकाश आबिटकर यांचे नाव कर्जमाफीसाठीच्या यादीत आल्याचे स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले़

ठळक मुद्देकर्जमाफी योजनेसाठी अर्ज भरलेल्या सर्व पात्र शेतकºयांची कर्जमाफी होणारपात्र शेतकºयांनी गोंधळून जाऊ नये : सुभाष देशमुखचूक दुरूस्त करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा बँकेला देण्यात येतील

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि १६  : नावाच्या घोळामुळे कोल्हापूरतील शिवसेनेचे आ़ प्रकाश आबिटकर यांचे नाव कर्जमाफीसाठीच्या यादीत आल्याचे स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले़सहकार मंत्री सुभाष देशमुख हे शनिवारी पंढरपुरात एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला.आ़ प्रकाश आबिटकर यांच्याबाबतची घटना ही तांत्रिक बाब असू शकते, असे सांगून सुभाष देशमुख म्हणाले, प्रकाश अबिटकर नावाच्या दोन व्यक्ती आहेत. पण दोघांचे खाते वेगवेगळया बँकेत आहेत. शिवाय प्रकाश सुतार नावाच्या व्यक्तीचे आधार कार्ड, खाते नंबर आणि इतर माहिती तांत्रिक कारणाने ट्रेस न झाल्याने आ़ आबिटकर यांचे नाव कर्जमाफी शेतकºयाच्या यादीत आले असावे, असे देशमुख यांनी सांगितले.आबिटकर या आडनावाचे एकूण ३७ अर्ज आहेत. तसेच प्रकाश आबिटकर या नावाने सुध्दा एक अर्ज आहे, पण तो आमदारांचा नाही़ अर्ज नसतानाही कोल्हापूर जिल्हा बँकेने आ. प्रकाश आबिटकर यांचे खाते या योजनेच्या लाभासाठी सरकारकडे पाठविले़ एक अर्ज प्रकाश सुतार या व्यक्तीच्या नावाने आहे़ प्रकाश आबिटकर आणि प्रकाश सुतार या दोघांचाही एकच कर्जखाते क्रमांक कोल्हापूर जिल्हा बँकेने दिला आहे. त्यामुळे आ. प्रकाश आबिटकर यांचे नाव यादीत आले. हे दोन्ही खाते १८ महिन्यांचे पीककर्ज घेतलेली खाती आहेत. दोघांनीही पूर्ण कर्ज परत केले आहे. शिवाय आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आ. प्रकाश अबीटकर यांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने ही चूक दुरूस्त करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा बँकेला देण्यात येतील, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले़कर्जमाफी योजनेसाठी अर्ज भरलेल्या सर्व पात्र शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे पात्र शेतकºयांनी गोंधळून जाऊ नये, असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले़ एफआरपी देणे बंधनकारकजे साखर कारखाने एफआरपीप्रमाणे उसाला दर देणार नाहीत़ त्यांच्यावर कारवाई होणारच आहे़ एफआरपी देणे बंधनकारक आहे़ शिवाय आगामी काळात साखर कारखान्यातील वजन काटे आॅनलाईन करत आहोत, अशी माहिती ही सुभाष देशमुख यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख