शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

माझ्या नावावर भाजपच्या तीन नगरसेवकांनी घेतले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:46 IST

सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी याचा खळबळजक आरोप; आमचा एक नगरसेवक म्हणजे क्वाईन बॉक्स ?

ठळक मुद्देपालकमंत्री गटाच्या नगरसेवकांनी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांना निलंबित करण्याची मागणी केलीनगरसेवक सुरेश पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा महापौरांवर टीका केलीशासनाच्या विविध योजनांमधून शहरात रस्ते आणि भुयारी गटारीची कामे प्रस्तावित

सोलापूर : भाजपच्या तीन नगरसेवकांनी माझ्या नावावर भवानीपेठेतील एका घरात कंत्राटदारांकडून टक्केवारीचे पैसे घेतले. या कंत्राटदारांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. या नगरसेवकांनी पक्षाला बदनाम करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांची नावे पक्षश्रेष्ठींना कळविणार असल्याचा खळबळजनक खुलासा महापौर शोभा बनशेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

महापालिकेच्या आठ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत रस्ते, भुयारी गटारीच्या कामाचे दहा कोटींहून अधिक रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. या प्रस्तावांवरील सूचना आणि उपसूचना महापौरांनी नगरसचिव कार्यालयाला दिल्या नव्हत्या. त्यामुळे गेले तीन महिने हे प्रस्ताव महापौर कार्यालयात पडून होते. याबद्दल पालकमंत्री गटाच्या नगरसेवकांनी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांना निलंबित करण्याची मागणी केली. नगरसेवक सुरेश पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा महापौरांवर टीका केली.

अखेर प्रभारी नगरसचिव महमंद रऊफ बागवान यांनी हे सर्व प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे पाठविले. हे ठराव का रोखून ठेवले होते, असा प्रश्न महापौर बनशेट्टी यांना विचारला असता त्या म्हणाल्या, ‘ना खाउंगा - ना खाने दुंगा’ असे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. पण आमच्या पक्षातील काही नगरसेवकांना हे मान्य नाही. वर्षानुवर्षे कंत्राटदार, मनपा अधिकाºयांकडून पैसे उकळण्याचे काम हे लोक करीत आहेत. शासनाच्या विविध योजनांमधून शहरात रस्ते आणि भुयारी गटारीची कामे प्रस्तावित झाली. ही कामे करण्यास इच्छुक असलेल्या कंत्राटदारांना आमच्या पक्षातील तीन नगरसेवकांनी बोलावून घेतले. 

भवानीपेठेतील घरी त्यांच्याकडून टक्केवारीचे पैसे घेण्यात आले. टक्केवारी दिली नाही तर कामे मंजूर होऊ देणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. मनपा सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संमतीने आम्ही दहा कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. यादरम्यान काही कंत्राटदारांनी आमच्याशी संपर्क केला. तुमचे नाव सांगितल्यामुळे आम्ही त्या नगरसेवकांना पैसे दिल्याचे ते सांगू लागले. मला ही गोष्ट पटली नाही. कंत्राटदारांसोबतच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. आयुक्तांना हे रेकॉर्डिंग ऐकविणार आहे, असेही बनशेट्टी यांनी सांगितले. 

आमचा एक नगरसेवक म्हणजे क्वाईन बॉक्स ?*- महापौर बनशेट्टी म्हणाल्या, आमचा एक नगरसेवक म्हणजे ‘क्वाईन बॉक्स’आहे. पैसे संपले की तो पत्रकार परिषदा घेऊन आरोप करू लागतो. मनपातील अधिकारी तर त्याला वैतागले आहेत. तो आणि त्याचा नेता काँग्रेसच्या लोकांना हाताशी धरून राजकारण करतात. अलीकडच्या काळात सर्वांनाच ही गोष्ट कळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाटेमुळे आम्ही अनेक निवडणुका जिंकल्या. पण या लोकांना आपणच नगरसेवक, खासदार निवडून आणले, असा भ्रम निर्माण झाला आहे. या भ्रमातून ते दुकानदारी करीत आहेत. महापौरपदाचा कालावधी संपल्यानंतर मी त्यांचा आणखी भंडाफोड करणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgovernment schemeसरकारी योजना