शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरातील बेकायदा बांधकामावर महापालिकेचा हातोडा, पाच ठिकाणी पाडकाम सुरू, ३४० मिळकतदारांना दिल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 14:05 IST

जुळे सोलापुरातील पाच बेकायदा बांधकामावर सोमवारी मनपाच्या पथकाने हातोडा मारुन जमीनदोस्त केले. 

ठळक मुद्देबेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी आतापर्यंत ३४0 मिळकतदारांना नोटिसा दिल्या बांधकाम परवाना विभागाचे उप अभियंता रामचंद्र पेंटर, सहायक अभियंता खानापुरे यांच्या पथकाने ही कारवाई केलीशहराच्या गावठाण भागाबरोबरच हद्दवाढ भागात अणखी काही अशी बांधकामे असून ती हटविण्यासाठी कारवाई ही लवकरच हाती घेण्यात येणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : जुळे सोलापुरातील पाच बेकायदा बांधकामावर सोमवारी मनपाच्या पथकाने हातोडा मारुन जमीनदोस्त केले. जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनीतील बनशंकरी नगरात असलेल्या ब्लॉक नं. १२ मध्ये शिवलिंगप्पा आनंदपूरकर यांनी अंबर बिर्याणी हाऊसमध्ये फ्रंट मार्जीनमध्ये विनापरवाना बांधकाम केले होते. हे बांधकाम पथकाने हटविले. त्याचबरोबर प्लॉट नं. १९ मधील प्रचंडे यांनी फ्रंट मार्जीनमधील पार्किंगमध्ये अनधिकृत बांधकाम करून दुकान थाटले होते. हे बांधकाम काढण्यात आले. प्लॉट नं. २३ मध्ये श्री सिद्धेश्वर दुग्धालयचे फ्रंट मार्जीनमधील पार्किंगमध्ये बांधकाम करण्यात आल्याचे आढळून आले होते. नोटीस देऊनही त्यांनी बांधकाम न काढल्याने पथकाने हे बांधकाम हटविले. प्लॉट नं. २४ मध्ये सुनील आबुटे यांनी फ्रंट मार्जीनमधील पार्किंगमध्ये बांधकाम करून रहिवासासाठी वापर सुरू केला होता. हे बांधकाम पथकाने काढून टाकले. प्लॉट नं. ३६ मधील विनोद म्हेत्रस यांनी फ्रंट मार्जीनमधील पार्किंगमध्ये बांधकाम करून निवासासाठी वापर सुरू केला होता. हे बांधकाम हटविण्यात आले. त्याचबरोबर न्यू पाच्छापेठेतील विठ्ठल घनाते यांनी फ्रंट मार्जीनमध्ये विनापरवाना केलेले बांधकाम पाडण्यात आले. बांधकाम परवाना विभागाचे उप अभियंता रामचंद्र पेंटर, सहायक अभियंता खानापुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दोन महिन्यापूर्वी महापालिकेने अशीच कारवाई करुन नामांकित हॉटेलसह शहरातील अनेक बेकायदेशीर बांधकामे पाडली होती. आता ही मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. शहराच्या गावठाण भागाबरोबरच हद्दवाढ भागात अणखी काही अशी बांधकामे असून ती हटविण्यासाठी कारवाई ही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. ज्यांनी अशा प्रकारे अतिक्रमण करुन बांधकाम केले आहे त्यांनी ते स्वत:हून हटवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.-----------------बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी आतापर्यंत ३४0 मिळकतदारांना नोटिसा दिल्या आहेत. त्यापैकी २८८ व्यावसायिक तर ५२ मंगल कार्यालये आहेत. यात मनपाने २९ ठिकाणी पाडकामे करून बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त केली आहेत. ४८ जणांनी स्वत:हून बेकायदा बांधकाम काढून घेतले आहे. २६ जणांना पाडकाम केलेला खर्च वसूल करण्याची नोटीस बजावली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका