शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पुरूषाला लाजवेल अशी शेतात राबणारी हिरजची कृषीकन्या मुमताज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 13:16 IST

बेरोजगारीवर केली मात; नोकरी मिळत नसल्याने शेती करण्याचा घेतला निर्णय

सोलापूर : कृषिप्रधान भारताचा मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीत स्वत:ला झोकून देत मागील पंधरा ते वीस वर्षापासून स्वत: कुळव हाकत कोळपणी ते नांगरणी ,पेरणी अशी मशागतीची सर्व कामे करणारी मुमताज मुस्तफा    शेख हे अफलातून व्यक्तीमत्त्व़ साधारणपणे मराठी माध्यमातून बारावीपर्यंत शिक्षण घेऊनसुद्धा शेतीच करायची हा दृढनिश्चय मनात ठेऊन त्या काळ्या आईची             सेवा इमानेइतबारे करत आहेत. त्यांना मुले नाहीत पण प्रधान्या आणि सर्ज्या ही जित्राबाच त्यांची मुले अन सवंगडी़ त्यांच्या मदतीने              एखाद्या पुरुषाप्रमाणे सर्व कामे करणारी मुमताज हिरजचे स्वाभिमान आहे. वडिलोपार्जित  शेती, चुलत्यांची शेती अशी पाच एकर शेती त्या स्वत: कसतात़ शेतातील बैलेजुंपून स्वत: कोळपणी तर करतात, नांगरणी, पेरणी करतात़ पीक आल्यावर काढणीची सर्व कामे ती प्रामाणिकपणे करते़.

सोमवारी सायंकाळी एकट्याच शेतात राबताना पाहून त्यांच्याशी संवाद साधला. आणि त्यांना बोलते केले . त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या़  पंधरा वीस वर्षापूर्वी स्त्री अनेक सामाजिक  बंधनात असताना माझ्या सारख्या सुशिक्षित मुलींनी शेती करण्याचा निर्णय घेतला .अनेक संकटांचा सामना करीत मागील वीस वर्षांपासून शेतात पुरुष जी कामे करतात ती सर्व कामे करते. आज मुलीं सर्वच क्षेत्रात मोठ्या हिंमतीने यशस्वी होत आहेत़ आपल्या कृषिप्रधान देश अधिक सुजलाम सुफलाम होण्यासाठी सध्याच्या युवापिढीतील युवतींसाठी शेती उत्तम पर्याय असून त्यामध्ये सक्रिय सहभागी  व्हावे . - मुमताज मुस्तफा शेख, महिला शेतकरी, हिरज ता. उत्तर सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेतीjobनोकरी