शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीअभावी महावितरणने तोडली मंगळवेढा तहसीलची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 17:25 IST

मंगळवेढा दि ३१ : मंगळवेढा तहसील कार्यालयाने महावितरणचे बिल न भरल्याने महावितरणच्या अधिकाºयांनी तहसील कार्यालयाची वीज तोडून झटका दिला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे १ लाख २० हजारांचे वीज बिल थकीतमहावितरणचा दुसरा शॉक पोलीस ठाण्याला

आॅनलाइन लोकमत सोलापूरमंगळवेढा दि ३१ : मंगळवेढा तहसील कार्यालयाने महावितरणचे बिल न भरल्याने महावितरणच्या अधिकाºयांनी तहसील कार्यालयाची वीज तोडून झटका दिला आहे. यामुळे तहसील कार्यालय तीन दिवसांपासून अंधारात होते. येत्या सोमवारी वीज बिल भरण्याच्या लेखी आश्वासनानंतर बुधवारी दुपारी वीज जोडण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे यांनी दिली.मंगळवेढा तहसील कार्यालयाकडे महावितरणचे १ लाख २० हजारांचे वीज बिल थकीत होते. वारंवार नोटिसा देऊनही तहसील कार्यालयाने वीज बिल भरण्यास टाळाटाळ केल्याने अखेर महावितरणने कनेक्शनला कात्री लावल्यानंतर दोन दिवसानंतर पाच दिवसांचा अवधी मागत सोमवारी वीज बिल भरण्याची तयारी तहसीलने दर्शविल्याने अखेर वीजपुरवठा जोडण्यात आला आहे.मागील आठवड्यात तहसीलदार प्रदीप शेलार निलंबित झाल्यानंतर नायब तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. सध्या तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम सुरु आहे. विद्युत पुरवठा ठप्प केल्याने या कामकाजावर परिणाम झाला होता. निलंबित तहसीलदार शेलार यांनी त्यांच्या कार्यकाळातील ही थकबाकी असून त्यांनी ती वेळेत भरली असती तर तहसीलवर अंधारात राहण्याची नामुष्की आली नसती.---------------------------महावितरणचा दुसरा शॉक पोलीस ठाण्यालामंगळवेढा शहरातील बहुतांशी शासकीय कार्यालयाच्या थकबाकीचा आकडा मोठा आहे. यामध्ये मंगळवेढा पोलीस ठाण्याची तब्बल ७६ हजारांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी वारंवार सूचना करूनही वीज बिल भरले नसून आता तहसीलनंतर पोलीस ठाण्याचा विद्युतपुरवठा खंडित करणार असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.------------------------वाढती थकबाकी, वीजगळती यामुळे डबघाईला येत असलेल्या महावितरणची गाडी रुळावर आणण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून वसुलीच्या सक्त सूचना प्राप्त झाल्या आहेत. कमी वसुली असणाºया तालुक्यातील अधिकाºयांना नोटिसा काढण्यात आल्या असून कारवाई करण्याचे संकेत दिल्याने वसुलीची मोहीम तीव्रपणे सुरु केली आहे. प्रत्येक थकबाकीदाराने आपले वीज बिल भरून वीजतोडणीची नामुष्की टाळावी.- संजय शिंदे, उपकार्यकारी अभियंता, मंगळवेढा