शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार विजयसिंह मोहिते-पाटलांचे सोलापुरात पालकमंत्र्यांना ‘उत्तर’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:08 IST

देशमुखांचा माळशिरस दौरा : मोहिते-पाटील गटही शहरात सतर्क

ठळक मुद्देविजयसिंह मोहिते-पाटील यांनी शहरातील विविध नेत्यांना अचानकपणे भेटी दिलीकुंभारी येथील वीरशैव प्रतिष्ठानच्या कार्यालयास खासदार मोहिते-पाटील यांनी भेटपालकमंत्र्यांवर नाराज असलेल्या गटाची खासदार मोहिते-पाटील यांनी भेट घेतल्याने कुंभारीतही हा विषय चर्चेचा

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या वारंवार भेटीची खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दखल घेत मंगळवारी सोलापुरात वीरशैव लिंगायत समाजातील विविध मान्यवरांच्या भेटी घेत ‘उत्तर’ दिले आहे. 

जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीच्या निमित्ताने समितीचे अध्यक्ष खासदार विजयसिंह मोहिते-पाटील मंगळवारी सोलापुरात आले होते. शासकीय विश्रामधाम येथील ही बैठक आटोपल्यानंतर त्यांनी शहरातील विविध नेत्यांना अचानकपणे भेटी दिल्या. यात श्री सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या गंगा निवास येथे त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, राजू सुपाते उपस्थित होते. हे सर्व जण बाहेर थांबले तर काडादी व मोहिते-पाटील यांनी बंगल्यात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत अर्धा तास चर्चा केली. 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युती झालीच तर शहर उत्तर सोलापूर विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा राहणार आहे. त्यादृष्टीने शहर उत्तरमध्ये संभाव्य उमेदवार कोण असावा, याबाबत गुफ्तगू झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी शहर उत्तर मतदार संघातील वीरशैव लिंगायत समाजातील नेत्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये राजशेखर शिवदारे हे विश्रामगृह येथे भेटीला आले होते. कक्षात दोघांची १५ मिनिटे चर्चा झाली. सुरेश हसापुरे यांना भेटीला येण्यास वेळ झाला. त्याचबरोबर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील राजकारणाबाबत चर्चा करून कानोसा घेतल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर कुंभारी येथील वीरशैव प्रतिष्ठानच्या कार्यालयास खासदार मोहिते-पाटील यांनी भेट दिली. प्रतिष्ठानचे जगदीश पाटील, राजशेखर विजापुरे, जगदीश लिगाडे, सिद्धय्या स्वामी, मनोज कोल्हे, अशोक नागणसूर, गिरीश मंद्रुपकर, विजय बुरकुल यांनी त्यांचे स्वागत केले. पालकमंत्र्यांवर नाराज असलेल्या गटाची खासदार मोहिते-पाटील यांनी भेट घेतल्याने कुंभारीतही हा विषय चर्चेचा झाला आहे.  

अचानक भेटीने चर्चा...- सुरक्षा समितीची बैठक आटोपल्यानंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे धर्मराज काडादी यांच्या भेटीला गेल्याची चर्चा सोलापुरात सुरू झाली. त्यानंतर या भेटीचा कानोसा घेतल्यानंतर पालकमंत्र्यांना ‘उत्तर’ देण्याची तयारी करीत असल्याचे सांगण्यात आले. माढा मतदार संघातील नेत्यांशी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केलेल्या जवळिकीची दखल घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखPoliticsराजकारणElectionनिवडणूक