शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे फुट टाकीवर चढून युवकाचं आंदोलन; मराठा आरक्षणासाठी रानमसलेत अन्नत्याग

By appasaheb.patil | Updated: October 31, 2023 13:21 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत.

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनं होत आहेत. मंगळवारी सकाळपासून आंदोलन सोलापुरात तीव्र झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील शिवाजी परमेश्वर गरड या युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावातील दोनशे फुट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या अनोख्या शोले स्टाईल आंदोलनामुळे हे आंदोलन चांगलेच चर्चेत आले आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील जिल्हा परिषद गेटसमोर सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला अनेक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. मंगळवारी सकाळपासून शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकले. सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात रेल रोको आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान, उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावात मराठा समाजाच्यावतीने आंदोलन सुरू आहे. गावडी दारफळ, नान्नज, वडाळा, बीबीदारफळ, कारंबा, गुळवंची, अकोलेकाटी, मार्डीसह अन्य गावातही आंदोलन सुरू आहे. नान्नज येथे सकाळी रस्त्यावर टायर पेटविण्यात आले होते. सकाळी दहा वाजता रानमसले येथील परमेश्वर गरड या युवकाने अनोखे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण