शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

मोहिनी एकादशी: विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाख भाविक पंढरीत फुलला विठ्ठल भक्तांचा मळा

By admin | Updated: May 11, 2014 00:11 IST

पंढरपूर : वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते.

पंढरपूर : वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. मोहिनी एकादशीनिमित्त महाराष्टÑाच्या कानाकोपर्‍यांतून पंढरीत भाविक दाखल झाले होते. यामध्ये भाविकांनी रेल्वेने पंढरपूरला येणे पसंत केले होते. यामुळे रेल्वे स्टेशनकडून विठ्ठल मंदिराकडे भाविक जादा संख्येने येत होते. दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. दुपारी दर्शन मंडपाचे आठ गाळे भरुन धोंडोपंतदादा मठापर्यंत रांग पोहचली होती. विठ्ठलाला नेहमीप्रमाणे सर्व नित्योपचार करण्यात आले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी होत असलेली वाढती गर्दी पाहून स्टेशन रोड व प्रदक्षिणा मार्गावर किरकोळ व्यापार्‍यांनी दुकाने थाटली होती. जादा गर्दी असणार्‍या चौफाळा चौकात मागील तीन दिवसांपासून पोलीस चौकीचे बनकर पडल्याने भाविकांना मंदिराकडे ये-जा करताना अडथळा निर्माण होत होता. मोहिनी एकादशीनिमित्त ४,५०० भाविकांनी आॅनलाईन विठ्ठलाच्या दर्शनासाठी बुकिंग केले होते. यामध्ये १२०० भाविकांनी शुक्रवारी तर २७५० भाविकांनी त्यापूर्वी आॅनलाईन दर्शन बुकिंग केले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलेल्या छोट्या दिंड्या प्रदक्षिणा मार्गावरुन फेरी मारुन जात होत्या. त्यामधील वारकरी जागोजागी भजन, कीर्तन केले जात होते. (प्रतिनिधी)

----------------------------------------

मोहिनी एकादशीचे महत्त्व

पूर्वी सरस्वती नदीकाठच्या भद्रावती नावाच्या नगरीवर ध्रुतिमान नावाच्या राजाचे राज्य होते. त्या नगरीत धनपाळ नावाचा धार्मिक सधन व्यापारी होता. त्याने जनकल्याणासाठी विहिरी, तलाव बांधले. त्याचबरोबर अनेक कामे केली. त्याला पाच मुले होती. त्यामधील चार मुले वडिलांप्रमाणे धर्म, नीती मानून वागणारी होती. तर पाचवा दुराचारी निघाला. व्यापार्‍याने त्याला घरातून हाकलून दिले. तो चोर्‍या करु लागला. त्याला अनेक वेळा राजसेवकांनी पकडले. परंतु त्याला व्यापार्‍याच्या चांगल्या वागणुकीमुळे सोडण्यात आले. परत त्याने मोठी चोरी केल्यामुळे त्याला राज्याबाहेर काढले. तो जंगलात गेला तेव्हा त्याला कष्टी जीवन जगावे लागले. त्याला पश्चाताप झाला. आपले आई-वडील, भाऊ ताठ मानेने जगतात, तसे आपण जगावे असे त्याला वाटले. याचवेळी त्याला अरण्यात कौंडिल्य ऋषी दिसले. त्याने त्यांच्यासमोर प्रांजळपणे सर्व अपराधाची कबुली दिली. तेव्हा ऋषी म्हणाले, मुला तू वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी व्रत कर, तुझ्या पापांचा नाश होईल. त्याने एकादशी व्रत केल्याने त्याच्या पापांचा नाश झाला, अशी दंतकथा सांगितले जाते.