कोरोनावरील उपचारासाठी ६६ लाख ६१ हजारांचा आमदार निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:22 AM2021-05-19T04:22:12+5:302021-05-19T04:22:12+5:30

करमाळा : कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आमदार निधीतून ६६ लाख ६१ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती आ. ...

MLA fund of 66 lakh 61 thousand for treatment of corona | कोरोनावरील उपचारासाठी ६६ लाख ६१ हजारांचा आमदार निधी

कोरोनावरील उपचारासाठी ६६ लाख ६१ हजारांचा आमदार निधी

Next

करमाळा : कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आमदार निधीतून ६६ लाख ६१ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

आमदार स्‍थानिक विकास कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत मतदार संघातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपजिल्हा रुग्णालय करमाळा व ग्रामीण रुग्णालय जेऊर यांच्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता वैद्यकीय उपकरणे व साधनसामग्री खरेदी करण्यासाठी ६६ लाख ६१ हजार रुपये निधीची तरतूद केली आहे.

करमाळा व जेऊर या ठिकाणी आरोग्य सुविधांसाठी २७ लाख ७९ हजार, तसेच ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ३८ लाख ८२ हजार अशी एकूण मतदारसंघासाठी ६६ लाख ३१ हजार रुपयांची तरतूद केली आहे.

----

करमाळा, जेऊरला ३६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

या निधीमधून प्राथमिक आरोग्य केंद्र केम, कोर्टी, वरकुटे, साडे, पिंपळनेर व रोपळे (क) या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये ६ लाख ४७ हजार रुपये किमतीचे साहित्य खरेदी केले जाणार आहे. यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर - २, ऑक्सिजन जंबो सिलिंडर ५, ऑक्सिजन रेग्युलेटर २, ऑक्सिजन सेंट्रल सिस्टिम ६ अशी साधनसामग्री खरेदी केली जाणार आहे. एकूण ६ उपकेंद्रांसाठी प्रत्येकी ६ लाख ४७ हजार याप्रमाणे एकूण ३८ लाख ८२ हजार रुपयांची तरतूद प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी केली आहे.

उपजिल्हा रुग्णालय, करमाळा व ग्रामीण रुग्णालय, जेऊर या दोन्ही ठिकाणी जवळपास ३६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी २७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच इतर सामग्रीसाठी ७९ हजार रुपयांची तरतूद केली आहे.

Web Title: MLA fund of 66 lakh 61 thousand for treatment of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.