शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

सोलापुरात परदेशी पक्ष्यांची मांदियाळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 02:19 IST

पावसाने जलाशये तुडुंब भरली; रशिया, कोरिया, फिलिपाईन्स, चीनमधील पाहुणे आले

सोलापूर : हिवाळ्याची चाहुल लागताच सोलापुरात रशिया, कोरिया, पाकिस्तान, फिलिपाईन्स, चीन या देशांचा प्रवास करून जगातील ७५ ते १०० शिकारी पक्षी सोलापुरात दाखल झाल्याची माहिती वाईल्डलाईफ फोटोग्राफर आणि पक्षीमित्र डॉ़ व्यंकटेश मेतन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सोलापूर हे पक्ष्यांचं नंदनवन आहे, हे आता सर्वांना परिचितच आहे़ दरवर्षी हिवाळ्यात परदेशातून अनेक पक्षी स्थलांतर करून सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरात येतात़ यावर्षीसुध्दा अनेक परदेशी पक्ष्यांचं सोलापुरात आगमन झालेलं आहे़ यात मोन्टोगो हॅरियर (मोंटुग्याचा भोवत्या), पॅलिड हॅरियर (पांढऱ्या भोवत्या), युरेशियन मार्श हॅरियर (दलदली भोवत्या), पाईड हॅरियर (कवड्या भोवत्या/हारीण), कॉमन केस्ट्रल (सामान्य खरूची), रेड नेक फाल्कन (लाल डोक्याचा ससाणा), युरेशियन स्पॅरो हॉक (युरेशियन चिमणीमार ससाणा) हे शिकारी पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर परिसरात आले आहेत.उजनी, हिप्परगा, कुरनूर, होटगी धरण परिक्षेत्राचे आवार मोठे असल्याने येथे मुबलक प्रमाणात जैवविविधता आढळते. त्यामुळे परदेशी दुर्मिळ पक्ष्यांचा सोलापूरकडील ओढा वाढला आहे़ मागील आठवड्यात कुरनूर धरणावर आॅस्प्रे हा शिकारी पक्षीदेखील दिसला गेला़ त्याचे आवडते खाद्य मासे आहे. हा एक विश्वव्यापी पक्षी असून, याचे प्रजनन केवळ अमेरिकेतील भौगोलिक परिस्थितीत होते. वास्तविक हा पक्षी आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळत नसल्याचेही पक्षीमित्रांनी सांगितले.शिकारी पक्षी शेतकऱ्यांचे मित्रपरदेशातून आलेले शिकारी पक्षी हे शेतकºयांचे मित्र बनले आहेत़ शेतीला उपद्रव करणारे मोठे किडे, कीटक, नाकतोडे, टोळ, उंदीर, घुशी, ससे, मासे, साप, पक्षी, फडफड, लहान सस्तन प्राणी, सरडे यांची शिकार करून नैसर्गिक नियंत्रक म्हणून ते कार्य करतात़