मुस्लीम कब्रस्तानची स्वच्छता !
सोलापूर : येथील उडान फाउंडेशनच्या छत्रपती ग्रुपच्या मावळ्यांनी परंडा रोडवरील मुस्लीम कब्रस्तानात सफाई मोहीम हाती घेऊन आपली सामाजिक बांधीलकी जोपासली.
कब्रस्तानातील वाळलेले गवत, कटेरी झुडपे, पाऊल वाट, अंतर्गत रस्ते आदी ठिकाणी साफसफाईच्या कामाला प्रारंभ केला. गेल्या १८ दिवसांपासून ही तरुणाई आपले योगदान देत आहे. विशेष म्हणजे या तरुणांचा उत्साह आणि नि:स्वार्थ भावना पाहून शहरातील विविध संघटना आणि मान्यवरही साफ-सफाई कामात उतरले आहेत. विजेता जिमच्या जवळपास ६० ते ७० सदस्यांनीही कामात आपले योगदान दिले.
बार्शीतील तरुणाई सामाजिक आणि विधायक उपक्रमांसाठी आवर्जून पुढे येत आहे. कुजाणीव फाउंडेशनने स्मशानभूमीत वृक्षलागवड करून तेथील चेहरा-मोहरा बदलला. त्यानंतर, मुस्लीम तरुणांनीही कब्रस्तानच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाला सुरुवात केली आहे. छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अजय टिंकू पाटील यांनीही आपल्या मित्र परिवारासमवेत रविवार सुट्टीचा दिवस गाठून सकाळी २ ते ३ तास योगदान देत आहे.